Rakesh Jhunjhunwala Tips: राकेश झुनझुनवालांच्या गोल्डन टिप्स; या फॉलो करुन व्हा शेअर मार्केटचे किंग...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 07:53 PM2022-12-13T19:53:31+5:302022-12-13T19:56:13+5:30

Rakesh Jhunjhunwala Portfolio: राकेश झुनझुनवाला आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या टिप्स आजही लोकांच्या खूप कामी येतात.

Share Market: शेयर मार्केटचे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) आज आपल्यामध्ये नाहीत. पण, त्यांच्या आठवणी आजही लोकांच्या मनात ताज्या आहेत. झुनझुनवालांनी शेअर बाजारातील गुंतवणूकीत सर्वोच्च स्थान मिळवले आहे. आजही अनेकज त्यांच्या टिप्स फॉलो करुन शेअर बाजारात मोठी कमाई करतात...

लॉन्ग टर्म इंवेस्टमेंट- राकेश झुनझुनवाला नेहमी सांगायचे की, शेअर बाजारात लॉन्ग टर्म इंवेस्टमेंट करावी. कधीही लहान प्रॉफिटसाठी शेअर बाजारात येऊ नये. शेअर बाजारात जितक्या जास्त दिवस पैसे ठेवाल, तितकेच जास्त रिटर्न्स तुम्हाला मिळतील. योग्य कंपनीत जास्त दिवस गुंतवणूक केल्यास फायदाच होत असतो.

इमोशनल इंवेस्टमेंटपासून दूर राहा- झुनझुनवाला सांगायचे की, शेअर बाजारात गुंतवणूक करताना कधीही इमोशनल होऊ नका. इमोशनल इंवेस्टमेंट म्हणजे मंदिच्या काळात पटापट विकणे आणि बाजारात चांगला असेल तर पटापट खरेदी करणे, असे करू नका. योग्य वेळ पाहूनच निर्णय घ्या.

अभ्यास करा- राकेश झुनझुनवाला सांगतात की, कोणत्याही कंपनीत गुंवणूक करण्याआधी त्या कंपनीची सखोल अभ्यास करा. कंपनीची संपूर्ण माहिती घेऊनच गुंतवणूक करावी.

हिस्टोरिकल डेटावर अवलंबून राहू नका- एखाद्या शेअरची आधीची कामगिरी कशी आहे, यावर गुंतवणूक ठरवू नका. आज निर्णय घेण्यासाठी भूतकाळातील आकडेवारी पाहू नका. बाजाराचा चांगला अभ्यास करुनच निर्णय घ्या. या काही टीप्स राकेश झुनझुनवाला नेहमी सांगायचे.