Multibagger Stock: २₹ च्या शेअरनं दिला १८००० टक्के रिटर्न; १ लाखांचे झाले १.८१ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 01:04 PM2022-02-20T13:04:02+5:302022-02-20T13:10:40+5:30

Multibagger Stock: शेअर बाजारातून (Stock Market) मधून नफा कमावायचा असेल तर तुमच्याकडे पेशन्सही असणं आवश्यक आहे.

Multibagger Stock: तुम्ही शेअर बाजारातूनही (Stock Market) मोठी कमाई करू शकता, परंतु यासाठी तुम्हाला संयम बाळगणे खूप महत्त्वाचे आहे. शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हे एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करण्यासारखेच आहे.

चार्ली मुंगेरच्या मते, स्टॉक शक्य तितक्या दीर्घ कालावाधीसाठी ठेवला पाहिजे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत चांगला परतावा मिळू शकतो आणि जोखीमही कमी होते.

आज आपण अशा स्टॉकबद्दल बोलत आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 18,000 टक्के मल्टीबॅगर रिटर्न (Multibagger Return) देऊन शेअरधारकांना श्रीमंत केले. रमा फॉस्फेट्स असे या स्टॉकचे नाव आहे.

हा मल्टीबॅगर स्टॉकमध्ये मात्र गेल्या एक महिन्यापासून विक्रीचा परिणाम दिसून येत आहे. रमा फॉस्फेट्सच्या शेअरची किंमत ₹400 वरून ₹361 पर्यंत घसरली आहे. या कालावधीत जवळपास शेअर्सच्या किंमतीत 10 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

गेल्या 6 महिन्यांपासून हा स्टॉक स्थिर राहिला आहे. तसंच या स्टॉकनं आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीत केवळ 8 टक्के रिटर्न्स दिले आहेत.

गेल्या एका वर्षात, हा स्टॉक ₹108 वरून ₹361 पर्यंत वाढल्यानंतर 235 टक्के रिटर्न्स दिले आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 5 वर्षांत रमा फॉस्फेटच्या शेअरची किंमत ₹75.95 वरून ₹362 च्या पातळीवर गेली आहे.

गेल्या 10 वर्षांत, या मल्टीबॅगर शेअरची किंमत सुमारे 51 वरून 362 पर्यंत वाढली आहे, या कालावधीत याच्या किंमतीत तब्बल 610 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गेल्या 19 वर्षांत, स्टॉक ₹2 (13 मार्च 2003) वरून ₹362 पर्यंत वाढला आहे, या कालावधीत सुमारे 18000 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

रमा फॉस्फेटच्या शेअरच्या किमतीच्या किंमतीनुसार जर एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये वर्षभरापूर्वी ₹1 लाख गुंतवले असते, तर त्याचे ₹1 लाख आज ₹3.35 लाख झाले असते, तर 5 वर्षांत ते ₹4.80 लाख रुपये झाले असते.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 1 लाख रुपये 7.10 लाख झाले असते. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने 19 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती आणि या कालावधीपर्यंत या स्टॉकमधील गुंतवणूक कायम ठेवली असती तर आज त्याच्या 1 लाख रुपयांचे मूल्य 1.81 कोटी झाले असते.