ramdev baba announced that ruchi soya to launch fpo next year
रामदेव बाबांची मोठी घोषणा; अनेकांना मिळणार कमाईची संधी By कुणाल गवाणकर | Published: November 16, 2020 07:32 PM2020-11-16T19:32:11+5:302020-11-16T19:36:06+5:30Join usJoin usNext ग्राहकोपयोगी वस्तूंच्या आघाडीवर असलेल्या पतंजलीनं मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे अनेकांना कमाईची मोठी संधी मिळणार आहे. पतंजलीनं अल्पावधीच भारतीय बाजारात महत्त्वाचं स्थान पटकावलं. कंपनीनं वेगानं मुसंडी मारत प्रस्थापित कंपन्यांना घाम फोडला. पतंजली आयुर्वेदच्या अंतर्गत येणारी खाद्य तेल कंपनी रुची सोया पुढील वर्षी फॉलो-ऑन पब्लिक ऑफर आणणार आहे. रुची सोया खाद्य तेल निर्मिती क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. रुची सोयामध्ये असणारी प्रवर्तकांची गुंतवणूक कमी करण्याचा निर्णय पतंजलीनं घेतला आहे. रामदेव बाबांनी याबद्दलची माहिती दिली. पतंजली आयुर्वेदनं गेल्याच वर्षी रुची सोया कंपनी खरेदी केली. चालू आर्थिक वर्षात कंपनीची वेगानं वाढ होईल असा विश्वास रामदेव बाबांनी व्यक्त केला आहे. पतंजलीनं गेल्या वर्षी तोट्यात गेलेली रुची सोया ४ हजार ३५० कोटी रुपयांना विकत घेतली. रुची सोया शेअर बाजारात नोंद असलेली कंपनी आहे. सध्याच्या घडीला रुची सोयामध्ये प्रवर्तकांची ९९ टक्के गुंतवणूक आहे. कंपनीतील प्रवर्तकांची गुंतवणूक ७५ टक्क्यांवर आणण्याचं उद्दिष्ट पतंजलीनं ठेवलं आहे. कंपनीतील प्रवर्तकांची गुंतवणूक कमी करण्यासाठी पुढील वर्षी एफपीओ जारी करेल, असं रामदेव बाबांनी सांगितलं. जून २०२१ पर्यंत कंपनीतील प्रवर्तकांची गुंतवणूक १० टक्क्यांनी कमी करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. यानंतरच्या ३६ महिन्यांत कंपनी गुंतवणुकीतील आपला वाटा २५ टक्क्यांपर्यंत कमी करेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली.टॅग्स :रामदेव बाबापतंजलीBaba Ramdevpatanjali