सिर्फ नामही काफी हैं! Tata चा पाठिंबा मिळताच ‘या’ कंपनीने कमावले २२८ कोटी; IPO पूर्वी धमाका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 09:52 AM2022-03-16T09:52:01+5:302022-03-16T09:56:10+5:30

Tata चा पाठिंबा मिळताच या कंपनीने रॉकेट स्पीड पकडला असून, काहीच दिवसांत कोट्यवधींची घसघशीत कमाई केली आहे.

TATA ग्रुप आताच्या घडीला अनेकविध क्षेत्रात कार्यरत असून, विविध क्षेत्रातील कंपन्या दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. अगदी भारतीय बाजारपेठेपासून ते शेअर मार्केटपर्यंत टाटाच्या अनेक कंपन्या कमाल कामगिरी करत आहेत.

TATA ग्रुप देशातील सर्वांत मोठा औद्योगिक समूह असून त्यात ११० हून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. अलीकडेच टीआरए रिसर्चने देशभरात एक सर्वेक्षण केले, यामध्ये जवळपास एक हजारपेक्षा जास्त ब्रँड्सचा समावेश असून, केवळ TATA ग्रुपचे ३६ ब्रँड सर्वांत विश्वासार्ह ब्रँड आहेत.

याशिवाय TATA ग्रुप अनेक स्टार्टअप, उदयोन्मुख कंपन्यांना आर्थिक आणि अन्य प्रकारची मदत करत असतो. यापैकी टाटाचे समर्थन मिळालेली एक कंपनी म्हणजे ब्ल्यूस्टोन कंपनी. टाटाचा पाठिंबा मिळताच या कंपनीने रॉकेट स्पीड पकडला असून, काहीच दिवसात तब्बल २२८ कोटींची कमाई केली आहे.

टाटा समर्थित Bluestone कंपनीचा लवकरच IPO येणार आहे. यापूर्वीच कंपनीने धमाका केला असून, तीन कोटी डॉलरची कमाई केल्यामुळे कंपनीचे व्हॅल्यूएशन वाढले आहे. यामुळे कंपनीला मोठा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

ब्लूस्टोनने सांगितले की, कंपनी या पैशाचा वापर आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी करेल. कंपनीने हिरो एंटरप्राइझचे चेअरमन सुनील कांत मुंजाल यांच्याशिवाय अन्य कोणत्याही गुंतवणूकदाराचे नाव उघड केलेले नाही.

ब्लूस्टोनचे संस्थापक आणि सीईओ गौरव सिंह कुशवाह यांनी सांगितले की, कंपनी सध्याच्या ७० किरकोळ स्टोअरची संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे. पुढील आर्थिक वर्षात १०० नवीन रिटेल स्टोअर्स उघडण्याची आणि २०२४ पर्यंत स्टोअरची संख्या ३०० पर्यंत नेण्याची कंपनीची योजना आहे.

Bluestone ही भारतातील आघाडीच्या ज्वेलरी चेनपैकी एक आहे आणि प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) द्वारे १५०० कोटींहून अधिक निधी उभारण्याची योजना आखत आहे.

Bluestone कंपनीने ICICI सिक्युरिटीज, IIFL सिक्युरिटीज, जेफरीज आणि जेएम फायनान्शिअल यांना IPO साठी गुंतवणूक बँकर म्हणून नियुक्त केले आहे. कंपनीचे मूल्यांकन १२ हजार ते १५ हजार कोटी असणे अपेक्षित आहे.

Bluestone ने कमाई केलेल्या २२८ कोटी रुपयांनंतर कंपनीचे व्हॅल्यूएशन ४१ कोटी डॉलरवर गेले आहे. ब्लूस्टोनने हे पाऊल अशा वेळी उचलले आहे जेव्हा कंपनीदेखील आपला IPO घेऊन येत आहे.