Ratan Tata Lifestyle Net Worth House Price And Car Collection
जमिनीशी नाळ जोडलेल्या रतन टाटांबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित्येय का? वाचून नवल वाटेल By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 02:37 PM2021-09-27T14:37:57+5:302021-09-27T14:41:33+5:30Join usJoin usNext जर मेहनत पूर्ण मनापासून करत असू तर विजय तुमचाच असतो असं म्हटलं जातं. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा. टाटा ग्रुप ऑफ कंपनीला रतन टाटा यांनी यशाच्या उंच शिखरावर नेऊन पोहचवलं आहे. आज संपूर्ण विश्वात टाटा यांचा बोलबाला आहे. टाटा कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करते. रतन टाटा यांची मेहनत आणि कठोर परिश्रम यामुळे टाटा यांचं नावलौकीक आहे. आज मेहनतीच्या जीवावरच टाटा यांच्या कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. त्यांच्याकडे लग्झरी गाड्या आणि आलीशान बंगला आहे. जाणून घेऊया रतन टाटा यांच्या जीवनाबद्दल... रतन टाटा चॉकलेटसोबत अनेक खाण्याचे शौकीन आहे. त्यांना पारशी डिश आणि गुजराती जेवण करणं खूप आवडतं. त्यांच्या शेफचं नाव परवेज पटेल असं आहे. जो खूप प्रसिद्ध आहे. शेफच्या मते, रतन टाटा मटन पुलाव दाल, खूप कस्टर्ड आणि लसणाचा तडका दिलेली मसूरची डाळ खूप आवडीनं खातात. रतन टाटा यांनी सर्वसामान्यांसाठी एक स्वप्न पाहिलं होतं. प्रत्येक माणसाला चारचाकीतून फिरता यावं यासाठी रतन टाटांनी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट नॅनो ही कार भारतात सर्वात स्वस्त कार बाजारात आणली. अवघ्या १ लाखात ही कार लोकांना खरेदी करता आली. रतन टाटा यांच्याकडे कार आहेत तसं फाइट जेटही आहेत. त्यांच्याकडे पायलटचं लायसन्स आहे. एकेकाळी भारतीय एअर फोर्स ए-१६ फायटर जेट त्यांनी उडवलं आहे. रतन टाटा यांना डॉग पाळणं खूप आवडतं. त्यांच्याकडे जर्मन शेफर्ड जातीचे कुत्रे आहेत. रतन टाटा यांच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या ताफ्यात अनेक लग्झरी कार पाहायला मिळतील. रतन टाटा यांना गाड्यांचा शौक आहे. त्यांच्याकडे जगुआर, मर्सिडीज एसएल ५००, फरारी कॅलिफोर्निया, लँड रोव्हर फ्रिलँडरसारख्या महागड्या गाड्या आहेत. रतन टाटा हे सोयीसुविधा युक्त असलेल्या बंगल्यात राहतात. कुलाबाच्या समुद्रकिनारी त्यांचे घर आहे. ३ मजल्याची इमारत १३ हजार फूटाची आहे. यातील पहिल्या भागात सन डेक आणि लिविंग एरिया आहे. तर बाकीच्या भागात जीम, लायब्रेरी, स्विमिंग पूल आणि लाऊज आणि स्टडी रुम आहेत. रतन टाटा यांची एकूण संपत्ती पाहिली तर नेट वर्थ डॉटनुसार १ बिलियन डॉलर इतकी आहे. टॅग्स :रतन टाटाRatan Tata