Ratan Tata: शेअर बाजारात 19 वर्षांनी टाटांची एंट्री; लवकरच IPO येणार By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 04:11 PM 2023-01-19T16:11:31+5:30 2023-01-19T16:28:13+5:30
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठ्या उद्योगजकांपैकी एक असलेल्या टाटा कंपनीचा नवीन आयपीओ शेअर मार्केटमध्ये येत आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठ्या उद्योगजकांपैकी एक असलेल्या टाटा कंपनीचा नवीन आयपीओ शेअर मार्केटमध्ये येत आहे.
याअगोदर १९ वर्षांपूर्वी टाटा कंपनीचा शेअर मार्केटमध्ये आयपीओ आला होता. टाटा मोटर्संची सहकारी कंपनी टाटा टेक्नॉलॉजीस या आयपीओच्या माध्यमातून ३५०० ते ४००० कोटी रुपये जमवू शकते.
यासाठी कंपनीचे व्हॅल्यूएशन १६,२०० ते २०,००० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. टाटा ग्रुपकडून या आयपीओसाठी काम करणे सुरू झाले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार कंपनी दोन सल्लागारांच्या माध्यमातून शेअर बाजारात उतरत आहे. तर, आणखी एक सल्लागार नियुक्त करण्यात येणार असल्याचे समजते.
गेल्याच महिन्यात टाटा मोटर्सच्या बोर्डाने टाटा टेकमध्ये आयपीओच्या माध्यमातून काही प्रमाणात भागिदारी विकण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर, कंपनीच्या अनलिस्टेड शेअर्समध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे.
टाटा ग्रुपकडून या आयपीओसाठी अद्याप कुठलीही तारीख निश्चित करण्यात आली नाही. योग्य वेळ येताच कंपनीकडून तारीखही जाहीर होईल, असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
टाटा सन्सचे सध्याचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांच्या कारकिर्दीतील हा टाटा ग्रुपचा पहिलाच आयपीओ असणार आहे. टाटा टेक्नॉलॉजीस डिजीटल, इंजिनिअरिंग आणि तांत्रिक सर्व्हीस सेक्टरमध्ये जगभरातील प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे,
त्यामध्ये, टाटा मोटर्सची ७४.४२ टक्के भागिदारी आहे. यासह ८.९६ टक्के भागिदारी अल्फा टीसी आणि ४.४८ टक्के भागिदारी टाटा कॅपिटल ग्रोथ फंड यांची आहे.
दरम्यान, टाटा ग्रुपने २००४ साली टीसीएस म्हणजे कन्सल्टींग सर्व्हीसेसचा आयपीओ शेअर बाजारात आणला होता. टीसीएस ही आज देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान कंपनी आहे.
भारत आणि आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत असलेल्या मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप १६,७१,८००.०७ करोड रुपये आहे. तर, टीसीएस कंपनीची मार्केट कॅप १२,३३,०८२.०२ कोटी रुपयांनी दुसऱ्या स्थानावर आहे.