Ration Card : रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 12:49 PM2023-03-12T12:49:00+5:302023-03-12T12:53:45+5:30

Ration Card Update:रेशनकार्ड धारकांसाठी मोदी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे.

Ration Card Update:रेशनकार्ड धारकांसाठी मोदी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. तुम्हीही शिधापत्रिकाधारक असाल तर आता मोफत रेशनसोबतच केंद्र आणि राज्य सरकारकडून तुम्हाला विशेष सुविधा मिळणार आहेत.

मोफत रेशनसोबतच करोडो कार्डधारकांना मोफत उपचाराची सुविधाही मिळणार आहे.

सरकारने अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या सर्व कुटुंबांसाठी आणखी एक सुविधा सुरू केली आहे. सर्व अंत्योदय कार्डधारकांच्या मोफत उपचारासाठी आयुष्मान कार्ड बनवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Ration Card Update: आयुष्यमान कार्डधारकांसाठी जिल्हा व तहसील स्तरावरही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत अंत्योदय कार्डधारक कुटुंबातील सर्व सदस्यांना आयुष्मान कार्ड बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सध्या अंत्योदय कार्डधारकांकडे आयुष्मान कार्ड उपलब्ध नाही. कार्डधारक संबंधित विभागात जाऊन त्यांची प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

पात्र लाभार्थी कार्ड मिळाल्यानंतर, जनसेवा केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र, आयुष्मान पॅनेलशी जोडलेले खासगी रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात अंत्योदय शिधापत्रिका दाखवून कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी आयुष्मान कार्ड बनवता येणार आहे.

सध्या सरकारकडून नवीन आयुष्मान कार्ड बनवले जात नाहीत. ज्या लाभार्थ्यांची नावे या योजनेत आहेत त्यांचेच कार्ड बनवले जात आहेत.

अंत्योदय कार्डधारकांना आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास उपचारासाठी बाहेर जावे लागणार नाही, अशी शासनाची योजना आहे. यासाठी शासनस्तरावरूनही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

दारिद्र्यरेषेखालील म्हणजेच बीपीएल कुटुंबांना अंत्योदय शिधापत्रिका दिली जाते. या कार्डद्वारे लाभार्थ्याला दर महिन्याला स्वस्त दरात खाद्यपदार्थ मिळतात. कार्डधारकांना एकूण ३५ किलो गहू व तांदूळ दिले जाते. यासाठी गहू २ रुपये किलो आणि तांदूळासाठी ३ रुपये किलो प्रमाणे पेसै द्यावे लागतात.