खूशखबर! : स्वस्तात सोनं विकत घेण्याची संधी! पुन्हा सुरू होतेय मोदी सरकारची 'ही' खास योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 01:42 PM2020-08-29T13:42:35+5:302020-08-29T13:51:45+5:30

गेल्या काही वर्षांपासून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार फिजिकल सोन्याची मागणी कमी करण्यासाठी एक खास योजना चालवत आहे. या योजनेला 'सुवर्ण बॉन्ड योजना', असे नाव देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत केंद्रातील मोदी सरकार पुन्हा एकदा सोने विकत आहे.

सरकार बॉन्डच्या स्वरुपात सोन्याची विक्री करत असते. या सोन्याची किंमत रिझर्व्ह बँकेकडून निश्चित केली जाते. रिझर्व्ह बँक वेळोवेळी या सोन्याची किंमत जारी करत असते.

ही किंमत बाजारातील फिजिकल सोन्याच्या तुलनेत कमी आणि सुरक्षित असते. तर जाऊन घेऊया या योजनेंतर्गत मिळणाऱ्या सोन्याच्या नव्या किमती विषयी.

रिझर्व्ह बँकेने यावेळी सुवर्ण बॉन्डची किंमत 5,117 रुपये प्रति ग्रॅम एवढी ठेवली आहे.

सुवर्ण बॉन्डच्या खरेदीसाठी डिजिटल पद्धतीने पैसे जमा केल्यास प्रति ग्रॅम 50 रुपयांची सुटही मिळणार आहे. अशा गुंतवणूकदारांच्या बॉन्डची किंमत 5,067 रुपये प्रति ग्रॅम एवढी असेल.

ही योजना 31 ऑगस्टला सुरू होऊन 4 सप्टेंबरला बंद होईल. याचाच अर्थ आपण या दरम्यान सोन्याची खरेदी करू शकता. या योजनेत कमीतकमी एक ग्रॅम सोने विकत घेता येऊ शकते.

हे सोने विकत घेण्यासाठी आपल्याला आपल्या बँक, बीएसई, एनएसईची वेबसाईट अथवा पोस्ट ऑफीसशी संपर्क साधावा लागेल...

...येथून सुवर्ण बॉन्ड डिजिटलपद्धतीने विकत घेतले जाऊ शकतात. ही एक प्रकारची अत्यंत सुरक्षित गुंतवणूक आहे. कारण यात सोन्याच्या शुद्धतेची आणि सुरक्षिततेचीही चिंता नसते.

आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये रिझर्व्ह बँकेने दहा हप्त्यांत एकूण 2,316.37 कोटी रुपये अर्थात 6.13 टनांचे सुवर्ण बॉन्ड जारी केले आहेत. तसेच कोरोना काळात गेल्या 6 महिन्यांपासून बॉन्ड जारी करण्यात येत आहे.

सांगण्याचा हेतू असा, की यावेळी गुंतवणूक टळल्यास आपल्याला आणकी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल. ही योजना सुरू करण्यामागचा सरकारचा हेतू, आयात आणि फिजिकल सोन्याची मागणी कमी करणे असा आहे.

Read in English