Mukesh Ambani : मुकेश अंबानींची स्मार्ट खेळी?, एका दिवसांंत कंपनीचे शेअर्स ९२ टक्क्यांनी वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 05:39 PM2022-06-21T17:39:35+5:302022-06-21T17:52:55+5:30

या शेअरनं मोठा परताना देत गुंतवणूकदारांनाही केलं अवाक्

Mukesh Ambani Revlon stock return: जगभरातील शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असल्याचं दिसून येत आहे. अमेरिकन शेअर बाजारातही मोठी घसरण होत आहे. अनेक गुंतवणूकदारांना गेल्या काही दिवसांमध्ये मोठा फटकाही बसला आहे.

या काळात असा एक स्टॉक देखील आहे ज्याने बंपर परतावा देऊन आपल्या गुंतवणूकदारांना आश्चर्यचकित केले आहे. हा शेअर आहे अमेरिकन कॉस्मेटिक कंपनी Revlon Inc. (Revlon inc) चा. रेव्हलॉनच्या स्टॉकनं गेल्या तीन-चार दिवसांपासून रॉकेट स्पीड पकडला आहे.

या शेअरनं दिलेले रिटर्न पाहून गुंतवणूकदारांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय. शेअर्समध्ये वाढ होण्यामागे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी हे कारण असल्याचं म्हटलं जात आहे.

चार दिवसांमध्ये रेवलॉनचा शेअर १.१७ डॉलर्सवरून (९१.३४ रूपये) वाढून ३.७३ डॉलर्स (२९१.१९ रूपये) वर पोहोचला आहे. यादरम्यान यात जवळपास २.५६ डॉलर्सची (१९९.८५ रुपये) वाढ झाली आहे. कामकाजाच्या चार दिवसांमध्ये या शेअरची किंमत २१८.८ टक्क्यांनी वाढली आहे. १३ जून ते १७ जूनदरम्यान या शेअरच्या किंमतीत वाढ झाली आहे.

The New York Stock Exchange नुसार एका ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर ९१.२८ टक्क्यांनी वाढला आहे. १६ जून रोजी हा शेअर १.९५ डॉलर्सवर बंद झाला. तर १७ जूर रोजी हा शेअर ३.७३ डॉलर्सवर बंद झाला. एका दिवसात यात १.७८ डॉलर्सची वाढ झाली.

दरम्यान, मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज अमेरिकन कंपनी रेवलॉन इंकच्या अधिग्रहणाची योजना आखत आहे. कॉस्मेटिक्स तयार करणारी ही अमेरिकन कंपनी दिवाळखोरीच्या मार्गावर आहे.

कंपनीनं बॅकरप्सीसाठी अर्जही केला आहे. यानंतर मुकेश अंबानी यांनी ही कंपनी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

कंपनीचा इतिहास अतिशय जुना आहे. सुरूवातीच्या काळात कंपनी नेल पॉलिसचा व्यवसाय करत होती. परंतु १९५५ मध्ये त्यांनी लिपस्टिकच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. हा एक आंतरराष्ट्रीय ब्रांड आहे. तसंच या कंपनीचा मालकी हक्क अब्जाधीश उद्योजक Ron Perelman यांच्याकडे आहे.