Reliance Jio चा जबरदस्त प्लॅन; मिळतेय विना लिमिट डेटा वापरण्याची मुभा आणि अनलिमिटेड कॉलिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 01:46 PM2022-02-19T13:46:32+5:302022-02-19T13:54:24+5:30

Reliance Jio : यूजर्सना आकर्षित करण्यासाठी जिओने असा प्लान आणला आहे ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही लिमिटशिवाय इंटरनेटचा वापर करू शकता.

रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये (Prepaid Recharge Plans) दरवाढीनंतर अनेक बदल केले आहेत. यूजर्सना आकर्षित करण्यासाठी जिओने असा प्लान आणला आहे ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही लिमिटशिवाय इंटरनेटचा वापर करू शकता.

याशिवाय या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ देण्यात येत आहे. जर तुम्हालाही आपल्या मर्जीनुसार डेटा वापरायचा असेल, तर Jio चा हा प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरण्याची शक्यता आहे.

रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्ही एका दिवसात कितीही डेटा वापरू शकता. म्हणजेच, दररोज वापरल्या जाणार्‍या डेटाची मर्यादा या प्लॅनसोबत देण्यात आलेली नाही.

ज्यामध्ये ग्राहकांना एक महिन्याची म्हणजेच पूर्ण 30 दिवसांची वैधता मिळते असा हा जिओचा एकमेव प्लॅन आहे. जिओच्या या प्लॅनची ​​किंमत 300 रुपयांपेक्षा कमी आहे. पाहूया यामध्ये आणखी कोणते बेनिफिट्स मिळतायत.

रिलायन्स जिओचा 296 रुपयांचा हा प्लॅन जिओच्या फ्रीडम प्लॅन्स कॅटेगरी अंतर्गत येतो. Jio च्या या प्लान मध्ये एकूण 25GB डेटा मिळतो. विशेष बाब म्हणजे या डेटामधून तुम्ही दररोज कितीही डेटा वापरू शकता.

याचाच अर्थ दररोज किती डेटा खर्च केला जाऊ शकतो यावर मर्यादा नाही. जिओचा हा एकमेव प्लान आहे ज्यामध्ये कोणतीही दैनिक डेटा मर्यादा नाही.

जिओच्या 296 रुपयांच्या या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय प्लॅनमध्ये Jio अॅप्सचे (Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि JioCloud) मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.