Jio, Airtel, Vi: 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येतात हे बेस्ट प्लॅन्स; Disney+ hotstar सह मिळतात अन्य बेनिफिट्स By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 06:35 PM 2022-03-30T18:35:34+5:30 2022-03-30T18:43:52+5:30
Airtel, Jio आणि Vi 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत. Airtel, Jio Vodafone Idea Plan: Airtel, Jio आणि Vi 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत. काही प्लॅन केवळ अनलिमिटेड बेनिफिट्स देत नाहीत तर OTT सबस्क्रिप्शनचं मोफत अॅक्सेसदेखील देतात.
यापैकी काही प्लॅन्समध्ये Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन आणि काही Amazon प्राइम मोबाइल एडिशन अमर्यादित कॉलिंग आणि दैनंदिन डेटा बेनिफिट्ससह ऑफर करत आहेत. तुम्ही 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्रीपेड रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर नक्कीच तुम्हाला मदत होईल.
जिओच्या 419 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 3GB डेटा दिला जातो. यासोबतच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचाही लाभ मिळतो. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे.
याशिवाय Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन ज्या ग्राहकांना हवं असेल ते 499 रुपयांचे प्रीपेड रिचार्ज वापरू शकतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा दिला जातो. याशिवाय दररोज 100 एसएमएसही देण्यात येतात. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचाही फायदा मिळतो. या प्लॅनची वैधता देखील 28 दिवसांची आहे.
Airtel बद्दल सांगायचं झालं तर, ग्राहकांना Airtel च्या 499 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन मध्ये Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळतं. या प्लॅनमध्ये ग्राहक दररोज 2GB डेटा वापरू शकतात. यासोबतच 100 SMS सारखे फायदेही दिले जातात. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे.
Vodafone Idea च्या 499 रुपयांच्या च्या प्रीपेड प्लॅन बद्दल सांगायचे जाले तर यामध्ये ग्राहकांना दररोज 2 GB डेटा दिला जातो. यामध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित मोफत कॉलिंग दिले जाते. यामध्ये Vi मुव्हीज आणि टीव्हीचाही अॅक्सेस देण्यात येतो. इतकेच नाही तर ग्राहकांना यामध्ये एका वर्षासाठी Disney+ Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन देण्यात येतं.