५० रूपयांनी स्वस्त, दररोज १ जीबी डेटा आणि अन्य बेनिफिट्स; पाहा कोणता आहे Reliance Jio चा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 03:24 PM2021-05-13T15:24:28+5:302021-05-13T15:32:56+5:30

Telecom Companies : सध्या सर्वच कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी देत आहेत नवनव्या ऑफर्स

जर मोबाईल रिचार्जचं तुमचं बजेट महिन्याला २०० रूपयांपेक्षा कमी आहे, तर रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel), व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) या कंपन्यांकडे अनेक उत्तम प्लॅन्स आहेत.

आज आपण दररोज १ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंगसह अन्य फायदे देणाऱ्या दुसऱ्या प्लॅन्सच्या बाबतीत माहिती घेणार आहोत.

रिलायन्स जिओचा एक १४९ रूपयांचा प्लॅन हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे.

तर दुसरीकडे दररोज १ जीबी डेटा देणाऱ्या प्लॅन्समध्ये एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाकडे १९९ रूपयांचा प्लॅन आहे.

याचाच अर्थ रिलायन्स जिओचा प्लॅन अन्य कंपन्यांच्या तुलनेत ५० रूपयांनी स्वस्त आहे. पाहूया या रिचार्ज प्लॅनमध्ये युझर्सना कोणते फायदे मिळतात.

रिलायन्स जिओच्या १४९ रूपयांचा प्लॅन उत्तम आहे. यामध्ये २४ दिवसांची वैधता मिळते.

तसंच या प्लॅनसोबत ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा देण्यात येतो. याचाच अर्थ ग्राहकांना एकूण २४ जीबी डेटा देण्यात येतो.

या शिवाय कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ देण्यात येतो.

तसंच दररोज १०० एसएमएसही पाठवता येता. याशिवाय ग्राहकांना जिओ अॅप्सचाही लाभ मिळतो.

एअरटेलचा रिचार्ज प्लॅन जिओच्या तुलनेत थोटा महागडा आहे. याचे दर १९९ रूपये इतके आहे.

या प्लॅनची वैधता २४ दिवसांची असून यात ग्राहकांना दररोज १ जीबी याप्रमाणे २४ जीबी डेटा मिळतो.

या प्लॅनसोबत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचा लाभ देण्यात येतो. याशिवाय ग्राहकांना एअरटेल एक्स्ट्रिम या अॅपचं सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.

व्होडाफोन आयडियाचाही प्लॅन जिओच्या प्लॅनपेक्षा थोडा महाग आहे. १९९ रूपयांच्या या प्लॅनची वैधता २४ दिवसांची आहे.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी याप्रमाणे २४ जीबी डेटा देण्यात येतो. तसंच यात अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ देण्यात येतो.

या प्लॅनसोबत ग्राहकांना रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. तसंच Vi Movies & TV चं बेसिक अॅक्सेसही देण्यात येतं.