Reliance Jio तयार करतेय समुद्रात जगातील सर्वात मोठी केबल सिस्टम; भारतासाठी ठरणार महत्त्वाची

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 08:41 AM2021-05-18T08:41:03+5:302021-05-18T08:45:59+5:30

Reliance Jio cable system : रिलायन्स जिओ भारताच्या जवळ समुद्रात करतेय आंतरराष्ट्रीय सबमरीन केबल सिस्टमची उभारणी

रिलायन्स जिओच्या भारतातील एन्ट्रीनंतर सर्वच दूरसंचार कंपन्यांचे धाबे दणाणले होते. परंतु रिलायन्स जिओ आता पुन्हा एकदा मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे.

रिलायन्स जिओ भारताच्या जवळपास समुद्रात एका आंतरराष्ट्रीय सबमरीन केबल सिस्टम तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

रिलायन्स जिओनं एका अधिकृत वक्तव्यात केबल सिस्टम तयार करत असल्याची माहिती दिली आहे.

भारत दोन नव्या सब सी केबल सिस्टमचं केंद्रस्थान असेल. यामुळे देशात वाढत्या डेटाच्या मागणीला समर्थन मिळेल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं.

रिलायन्स जिओनं या दोन नेक्स्ट जनरेशन केबल सिस्टमसाठी मुख्य जागतिक भागीदार आणि सबमरीन केबल सप्लायर SubCom सोबत करार करत आहे.

इंडिया-एशिया-एक्स्प्रेस (IAX) सिस्टम भारताला सिंगापुर आणि त्यापुढेही जोडणार आहे.

तर दुसरीकडे इंडिया युरोप एक्स्प्रेस (IEX) भारताला मध्य पूर्व भागाशी आणि युरोपशी जोडणार आहे.

IAX २०२३ च्या मध्यापर्यंत सेवेसाठी तयार होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

तर IEX २०२४ च्या सुरूवातीला सेवा देण्यासाठी तयार होईल असंही सांगण्यात आलं आहे.

जिओनं दिलेल्या माहितीनुसार सिस्टम कोणत्याही व्यत्ययाशिवाय इन्टरकनेक्ट करण्याशिवाय जगातील मोठ्या इंटर एक्सचेंज पॉईंट्स आणि कंटेंट हबसोबत जागतिक स्तरावर सेवेच्या विस्तारासाठीही कनेक्ट करेल.

IAX आणि IEX मुळे भारतात आणि बाहेर क्लाऊड सेवा आणि कंटेन्ट एक्सचेंज करण्याची कंझ्युमर आणि एन्टरप्राईज युझर्सची क्षमता वाढेल.

ही अधिक क्षमतेच्या आणि हाय स्पीड सिस्टम 200Tbps पेक्षा अधिक कॅपॅसिटी उपलब्ध करतील. तसंच हे १६ हजार किलोमीटर लांब असेल.

डिजिटल सेवा आणि डेटा वापरात जियो हा भारताच्या नेत्रदीपक विकासासाठी अग्रणी आहे, अशी प्रतिक्रिया कंपनीचे अध्यक्ष मॅथ्यू ओमेन यांनी दिली.

स्ट्रिमिंग व्हिडीओ, रिमोट वर्कफोर्स, 5G, IoT आणि त्याच्या पुढे जिओ भारत केंद्रीत IAX आणि IEX सबसी सिस्टम निर्माणात मोठी भूमिका बजावत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

जागतिक महासाथीदरम्यान हे मोठं आव्हान आहे. परंतु या महासाथीनं डिजिटल बदल आणि अधिक परफॉर्मन्स असलेल्या ग्लोबल कनेक्टिव्हिटीला वेगवान केल्याचंही त्यांनी नमूद केलं.