Jio ची भन्नाट ऑफर! 'या' रिचार्जवर मिळवा १४० रुपयांचा कॅशबॅक व १००० रुपयांचे बक्षीस By देवेश फडके | Published: February 20, 2021 03:40 PM 2021-02-20T15:40:33+5:30 2021-02-20T15:46:36+5:30
एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, जिओ, बीएसएनएल यांच्यातील तीव्र स्पर्धेमुळे ग्राहकांना कमी पैशांमध्ये चांगले प्लान ऑफर केले जात आहेत. रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन विशेष रिचार्ज ऑफर आणली आहे. यानुसार, रिचार्ज केल्यावर युझरला १०० रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि १००० रुपयांपर्यंत बक्षीस दिले जाणार आहे. टेलिकॉम कंपन्यांमध्ये वाढत चाललेली स्पर्धा ग्राहकांसाठी मात्र काही प्रमाणात फायद्याची ठरताना दिसत आहे. एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, जिओ, बीएसएनएल यांच्यातील तीव्र स्पर्धेमुळे ग्राहकांना कमी पैशांमध्ये चांगले प्लान ऑफर केले जात आहेत.
रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन विशेष रिचार्ज ऑफर आणली आहे. ही ऑफर २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत लागू असेल. या ऑफरनुसार रिचार्ज केल्यास कॅशबॅक आणि बक्षीस अशा दोन्ही गोष्टी ग्राहकांना मिळवता येऊ शकतात.
जिओच्या नवीन प्लान अंतर्गत रिचार्ज केल्यावर ग्राहकाला १०० रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि १००० रुपयांपर्यंत बक्षीस दिले जाणार आहे. यामुळे ग्राहकांचा फायदा होईल, असे सांगितले जात आहे.
जिओच्या नवीन ऑफर अंतर्गत जर 'पेटीएम'वरून जिओचे रिचार्ज केल्यास १०० रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर केला जात आहे. ही ऑफर जिओच्या नवीन ग्राहकांसाठी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या रिचार्जसाठी आहे.
जिओच्या ऑफरचा फायदा करून घेण्यासाठी युझरला पेटीएमवरून कमीत कमी ४८ रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. या अंतर्गत जुन्या ग्राहकांना १ हजार रुपयांपर्यंत बक्षीस मिळू शकते. बक्षीस म्हणून मिळालेल्या कूपन्सचा वापर शॉपिंगसाठी करता येऊ शकणार आहे.
जिओच्या नवीन युझरने 'फोनपे'वरून रिचार्ज केल्यास १४० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. त्याचसोबत २६० रुपयांचे स्क्रॅच अँड विन रिवॉर्ड ऑफर करण्यात आले आहेत. पहिल्या रिचार्जवर ८० रुपये आणि दुसऱ्या व तिसऱ्या रिचार्जवर ६०-६० रुपयांचा कॅशबॅक मिळू शकेल.
जिओ युझरला या ऑफरसाठी तुम्हाला कमीत कमी १२५ रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे. ही ऑफर यूपीआय आयडीवरून रिचार्ज केल्यास मिळणार आहे.
जिओच्या नवीन ऑफरनुसार, अॅमेझॉनवर १२५ रुपयांपर्यंत बक्षीस मिळू शकेल. नवीन आणि जुन्या अशा दोन्ही प्रकारच्या ग्राहकांसाठी अॅमेझॉनवर बक्षीस ऑफर करण्यात येत आहे.
जिओचे रिचार्ज मोबिक्विकवरून केल्यास पहिल्या ऑफरनुसार, १४९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त यूपीआय रिचार्जवर केल्यास ५ टक्के कॅशबॅक देण्यात येत आहे. या ऑफरवर सर्वाधिक ५० रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला जात आहे.
जिओच्या युझरने फ्रीचार्जवरून रिचार्ज केल्यास ३० रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला जात आहे. जुन्या ग्राहकांना २० रुपयांचा कॅशबॅक देण्यात येत आहे.