Reliance Jio: Jio यूजर्ससाठी खुशखबर! एकाच स्मार्टफोनवर चालवा 5 नंबर, सिमशिवाय करता येणार कॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 03:51 PM2022-03-04T15:51:46+5:302022-03-04T16:50:50+5:30

तुम्ही रिलायन्स जिओ युजर असाल तर कंपनीने तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. या अंतर्गत, तुम्ही एकाच फोनवर पाच नंबर वापरू शकता.

भारतातील दिग्गज टेलीकॉम कंपनी रिलायंस जिओ(Reliance Jio) ने एक अप्रतिम ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्ही एकाच स्मार्टफोनमध्ये पाच नंबर वापरू शकता आणि सिमशिवाय कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. आम्ही eSIM सपोर्टबद्दल बोलत आहोत, Jio युझर्स याचा लाभ घेऊ शकतात.

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये सिम न टाकताही फोन कॉल करू शकता. यासाठी ई-सिम सपोर्टची मदत घेतली जाते.

ई-सिम सपोर्ट हे असे फीचर आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या फोनमध्ये सिम कार्ड वापरण्याची गरज नसते. हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला जिओ स्टोअरमध्ये जावे लागेल.

तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनसाठी Jio e-SIM घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला आधी तुमच्या जवळच्या Reliance Digital किंवा Jio स्टोअरमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला तुमचा फोटो आणि आयडी प्रुफ देऊन नवीन कनेक्शन घ्यावे लागेल.

हे कार्ड अॅक्टीव्ह करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर एक विशेष फीचर डाउनलोड करावे लागेल. हे केल्यानंतर, तुमचे ई-सिम कम्पॅटिबल डिव्हाइस आपोआप ई-सिम कॉन्फिगर करेल.

तुम्ही ई-सिम सपोर्ट वापरत असल्यास, तुम्ही एकाच स्मार्टफोनवर अनेक ई-सिम वापरू शकता. याचा अर्थ तुम्ही एकाच स्मार्टफोनवर दोनपेक्षा जास्त नंबर वापरू शकता.

पण, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, तुम्ही एका वेळी फक्त एकच ई-सिम वापरू शकता. त्यामुळे दुसरे ई-सिम वापरण्यासाठी, तुम्हाला दुसर्‍या सिमवर स्विच करावे लागेल.

अशा प्रकारे जिओच्या ई-सिम सुविधेच्या मदतीने तुम्ही सिम न घालता तुमचा स्मार्टफोन वापरू शकता आणि एकाच फोनमध्ये अनेक नंबरदेखील वापरू शकता.