Reliance Jio नं 'या' तीन प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतीत केला बदल; पाहा संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 16:35 IST2022-02-05T16:16:59+5:302022-02-05T16:35:37+5:30

Reliance Jio Prepaid Plans : पाहा कोणते आहेत हे प्रीपेड प्लॅन्स.

Reliance Jio Prepaid Plans : देशातील पहिल्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) नं काही दिवसांपूर्वीच आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या (Prepain Recharge Plans) किंमती वाढवल्या होत्या.

आता कंपनीनं आपल्या जिओफोनच्या (JioPhone) ऑल इन वन प्लॅन्सना रिव्हाईज केलं आहे. कंपनीनं तीन प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केली आहे आणि दुसरीकडे आणखी एका नव्या JioPhone प्लॅनचीही घोषणा केली आहे.

हे प्लॅन्स केवळ जिओफोन ग्राहकांसाठीच उपलब्ध असतील. रिलायन्स जिओने एक नवा 152 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. या अंतर्गत ग्राहकांना दररोज 0.5 GB हाय-स्पीड 4G डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि एकूण 300 SMS ऑफर केले जातात.

या सोबत जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शनही मिळतं. तसंच या प्लॅनची वैधता 28 दिवसांती आहे. सध्या कंपनीचा हा सर्वात स्वस्त जिओप्लॅन आहे.

नवीन 152 रुपयांचा प्रीपेड JioPhone प्लॅन लाँच करण्यासोबतच, कंपनीने 155 रुपये, 186 रुपये आणि 749 रुपयांच्या JioPhone प्लॅनमध्ये देखील बदल केले आहेत. 155 रुपयांच्या JioPhone प्लॅनची ​​किंमत आता 186 रुपये असेल.

हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि त्यात दररोज 1GB हाय स्पीड डेटा, दररोज 100 SMS, अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि Jio अॅप्सचा सबस्क्रिप्शन देण्यात येतं.

186 रुपयांच्या JioPhone प्लॅनची ​​किंमत आता 222 रुपये असेल, ज्यात पूर्वीप्रमाणेच 2GB दैनंदिन हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 SMS आणि Jio अॅप्सच्या सबस्क्रिप्शनचा समावेश आहे. या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे.