Jio चा धमाका! 200 रुपयांवरील सर्व रिचार्जवर मिळतोय कॅशबॅक, अशी मिळवा दररोज 200 रुपयांची सूट By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 01:13 PM 2022-01-11T13:13:05+5:30 2022-01-11T13:28:06+5:30
Reliance Jio Cashback Offers : सध्या अनेक दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांना आपल्याकडे टिकवून ठेवण्यासाठी नवनव्या ऑफर्स आणत आहेत. सध्या अनेक दूरसंचार कंपन्या (Telecom Companies) आपल्या ग्राहकांना आपल्याकडे टिकवून ठेवण्यासाठी नवनव्या ऑफर्स आणत आहेत. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी काही ऑफर्स घेऊन आली आहे. परंतु सध्या जिओचे ग्राहक कंपनीच्या JioMart महा कॅशबॅक बद्दल थोडे कनफ्युज दिसत आहेत.
जेव्हा Jio ने ही कॅशबॅक ऑफर जाहीर केली तेव्हा अनेक ग्राहकाना ही ऑफर केवळ निवडक प्रीपेड प्लॅन्सवर लागू होईल असं वाटलं होतं. याशिवाय Jio च्या वेबसाइटवर देखील, ऑफर अंतर्गत फक्त तीन प्लॅन लिस्ट करण्यात आले होते. यामध्ये 299 रुपये, 666 रुपये आणि 719 रुपयांच्या प्लॅनचा समावेश होता. परंतु प्रत्यक्षात तसे नाही.
खरंतर, कंपनीनं याबाबत कोणतंही अधिकृत विधान जारी केलेले नाही, त्यामुळे बहुतांश ग्राहक संभ्रमात आहेत. TelecomTalk च्या रिपोर्टनुसार, Reliance JioMart Maha कॅशबॅक अंतर्गत, 200 रुपये किंवा त्याहून अधिक प्रीपेड प्लॅनवर 20 टक्के कॅशबॅक दिला जात आहे. म्हणजेच ते फक्त 3 प्रीपेड प्लॅन्सपुरते मर्यादित नाही.
दरम्यान, याची माहिती नसल्यानं अनेक ग्राहक 299 रुपये, 666 रुपये आणि 719 रुपयांचे रिचार्ज करत आहेत. ऑफर अंतर्गत, एका दिवसात कमाल 200 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो.
नुकताच कंपनीनं 2999 रुपयांचा वार्षिक प्लॅनही लाँच केला आहे. या वार्षिक प्लॅनमध्ये कंपनी अनेक बेनिफिट्स देत आहे. याशिवाय या प्लॅनवरदेखील ही ऑफर लागू होत आहे.
कॅशबॅक मिळवण्यासाठी MyJio अॅप किंवा जिओच्या वेबसाईटवरुनच रिचार्ज करणं आवश्यक आहे. या रिचार्जची किंमत 200 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असणं आवश्यक आहे. युझर्सना २० टक्के कॅशबॅकचा वापर आपल्या पुढील रिचार्जमध्ये करता येईल. कॅशबॅक अमाऊंट किंवा पॉईंट्सचा वापर ग्राहकांना Ajio, Jio Mart वरदेखील करता येऊ शकतो.
कंपनीनं आपल्या ग्राहकांसाठी सेलिब्रेशन ऑफर अंतर्गत 2999 रुपयांचा एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. हा कंपनीचा एकमेव प्लान आहे ज्यामध्ये दररोज 2.5GB डेटा देण्यात येतो. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. म्हणजेच एका रिचार्जवर वर्षभर पुन्हा रिचार्ज करण्याचं टेन्शनही राहणार नाही. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक फायदेही मिळतात.
हा एका वर्षांच्या वैधतेसह मिळणारा प्लॅन आहे. म्हणजेच 2999 रुपयांच्या एका रिचार्जवर तुम्हाला 365 दिवसांसाठी रिचार्ज करण्याची गरज नाही. या प्लानमध्ये दररोज 2.5GB डेटा मिळेल. याचाच अर्थ वर्षाला एकूण 912.5 GB डेटा देण्यात येणार आहे.
दैनंदिन मर्यादा संपल्यावर इंटरनेट 64Kbps च्या वेगाने चालेल. प्लॅनमधील सर्व नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉलिंग देखील उपलब्ध असेल. दररोज 100 एसएमएसदेखील दिले जातील. याशिवाय रिलायन्स जिओच्या Jio TV, Jio Cinema, Jio Security, Jio Cloud आणि अन्य अॅप्सचंही मोफत सबस्क्रिप्शन देण्यात येईल.
जिओच्या या प्लॅनमध्ये 365 दिवसांमध्ये दररोज 8.22 रुपये खर्च करून 2.5 GB डेटा मिळेल. तर 365 दिवसांसाठी दररोज 2 GB डेटासह कंपनीच्या प्लॅनची किंमत 2879 रुपये आहे. म्हणजेच, 120 रुपये अधिक भरल्यास, तुम्हाला 365 दिवसांसाठी दररोज 500 MB अधिक डेटा मिळेल.