Corona Vaccine : कोरोनाची लस घेण्यासाठी Reliance Jio करणार मदत; सुरू केली जबरदस्त सेवा By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 05:44 PM 2021-06-10T17:44:43+5:30 2021-06-10T17:51:12+5:30
Coronavirus Vaccine Reliance Jio : सध्या देशात १८ वर्षांवरील सर्वाच्या लसीकरणाला करण्यात आलीये सुरूवात. अनेकदा लोकांना लसीकरणाचे स्लॉट पाहण्यास येत आहेत समस्या. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु अनेकदा लोकांना स्लॉट बूक करताना समस्या निर्माण झाल्याची माहिती समोर आली होती.
परंतु नागरिकांच्या समस्यांकडे पाहत रिलायन्स जिओनं (Reliance Jio) एक खास सेवा सुरू केली आहे. याच्या सहाय्यानं लसीकरणाचे स्लॉट शोधण्यास मदत मिळणार आहे आणि सोपंही होणार आहे.
रिलायन्स जिओनं अन्य ग्राहक सेवांसोबतच आता Whatsapp चॅटबॉच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्यास सुरूवात केली आहे.
Reliance Jio च्या या विशेष सेवेचा लाभ घेण्यासाठी आता लोकांना प्रत्येक वेळी सेशन रिफ्रेश करण्याची किंवा वन टाईम पासवर्डची गरज भारणार नाही.
कोणत्याही समस्येशिवाय लोकांना सहजरित्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या उपलब्धतेविषयी माहिती मिळणार आहे.
जिओ युझर्सना आता Whatsapp चॅटबॉद्वारे आपला फोनही रिचार्ज करता येणार आहे. तसंच यासोबत चॅटबॉट समस्यांचं निराकरणही करणार आहे. याशिवाय कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या उपलब्धतेविषयी माहिती देणार आहे.
रिलायन्स जिओच्या ग्राहकांना या चॅटबॉट सेवेचा फायदा घेण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये सर्वप्रथम 7000770007 हा क्रमांक सेव्ह करावा लागेल.
त्यानंतर Whatsapp सुरू करून जिओ चॅटबॉसोबत चॅट ओपन करावं लागेल. त्यानंतर सर्वप्रथम त्यावर Hi असं लिहून मेसेज पाठवा. त्यानंतर तुम्हाला ज्या भागात लस घ्यायची आहे त्या ठिकाणचा पिनकोड टाका.
दरम्यान, हा चॅटबॉट केवळ रिलायन्स जिओच्याच ग्राहकांना मदत करणार नाही, तर अन्य मोबाईल सेवांचा लाभ घेणाऱ्यांनाही मदत करणार आहे. तसंच त्यांना लसीकरणाची माहिती मिळणार आहे.
अनरजिस्टर्ड नंबर किंवा नॉन जिओ नेटवर्कवरून माहित घेण्यासाठी ग्राहकांची रिक्वेस्ट मिळाल्यानंतर जिओ चॅटबॉट पहिले युझरचं व्हेरिफिकेशन करणार आहे.