Reliance Jio चा धमाका; Jio 91 Recharge मध्ये संपूर्ण महिन्यासाठी मिळणार Unlimited Calling, Data By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 11:55 AM 2024-09-18T11:55:02+5:30 2024-09-18T12:08:25+5:30
रिलायन्स जिओने काही महिन्यांपूर्वीच रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत बदल केला होता. आज आम्ही तुम्हाला अशा काही प्लॅन्सची माहिती देणार आहोत जे जबरदस्त ट्रेंडमध्येही आहेत. पाहूया कोणते आहेत हे प्लॅन्स. रिलायन्स जिओने काही महिन्यांपूर्वीच रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत बदल केला होता. आज आम्ही तुम्हाला अशा काही प्लॅन्सची माहिती देणार आहोत जे जबरदस्त ट्रेंडमध्येही आहेत आणि ज्यांची वैधता २८ दिवसांची आहे. तसंच यात मिळणारे फायदेही खूप चांगले आहेत.
जिओ ४४९ प्रीपेड प्लॅनबद्दल बोलायचं झालं तर तो २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. यात दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळतात. हाय स्पीड डेटा लिमिट संपल्यानंतर तुम्हाला ६४ केबीपीएस स्पीडनं इंटरनेट दिलं जाईल. हा प्लॅन खरेदी केल्यास जिओ अॅप्सचं सब्सक्रिप्शनही मिळतं.
जिओकडून ४४८ रुपयांचा नवा प्लॅनही दिला जात आहे. यात दररोज १०० एसएमएस, दररोज २ जीबी डेटा मिळतो. यासोबतच तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगदेखील दिलं जात आहे. या प्लानमध्ये १२ ओटीटी अॅप्सचा अॅक्सेस मिळतो. यात जिओ टीव्ही अॅप, सोनीलिव्ह, झी ५ यांचाही समावेश आहे.
जिओ ३९९ रिचार्ज प्लॅनबद्दल बोलायचं झालं तर यात अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस, दररोज २.५ जीबी डेटा दिला जात आहे. मात्र, इंटरनेट स्पीडची अजिबात चिंता करण्याची गरज नाही. तसंच जिओ अॅप्सचाही अॅक्सेस दिला जात आहे. अशावेळी हा तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय ठरू शकतो, असं म्हणता येईल.
जिओचा ३४९ रुपयांचा हा प्लॅन हीरो ५जी प्लॅन म्हणूनही ओळखला जातो. यात दररोज १०० एसएमएस मिळतील. याची वैधता २८ दिवसांची असून दररोज २ जीबी डेटा मिळतो. यात जिओ अॅप्सचे अॅक्सेस देखील मिळते. कंपनीने या प्लॅनला हीरो ५ जी असं टॅग केलं आहे.
जिओच्या ३२९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता देतो. तसंच दररोज १०० एसएमएस देखील मिळतात, याशिवाय यात १.५ जीबी डेटाही दिला जात आहे. यात जिओ क्लाउड आणि जिओ सावन प्रो सह जिओ अॅप्सचा अॅक्सेस मिळतो. जिओ सिनेमाचं देखील अॅक्सेस या प्लॅनसह मिळतो.
जिओ ९१ प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर तो फक्त जिओ फोन युजर्ससाठी आहे. जर तुम्हीही जिओ फोन युजर असाल तर तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, ५० एसएमएस, दररोज १०० एमबी डेटा मिळतो. याव्यतिरिक्त, आपल्याला लाइव्ह अॅप्सचा स्वतंत्रपणे अॅक्सेस देखील मिळतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही माय जिओ अॅपवरूनही हे रिचार्ज खरेदी करू शकता.