Jio Prepaid Plan: मुकेश अंबानींकडून Jio ग्राहकांना मोठं गिफ्ट; सर्वात लोकप्रिय प्लॅनबाबत महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 10:26 AM2024-07-24T10:26:08+5:302024-07-24T10:37:02+5:30

Jio Prepaid Plan: महिन्याभरापूर्वी रिलायन्स जिओने दरवाढ केल्यानंतर आता पुन्हा लोकप्रिय प्रीपेड प्लॅन रिव्हाइज केला आहे

रिलायन्स जिओने नुकतेच रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. दरवाढीनंतर लोकांच्या खिशावर बोजा वाढला आहे. मात्र आता जिओच्या एका निर्णयामुळे युजर्सना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिओने त्यांचा एक सर्वात लोकप्रिय प्रीपेड प्लॅन रिव्हाइज केला आहे. ग्राहकांकडून वारंवार होणारी मागणी मान्य करत रिलायन्सने जीओने हा मोठा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी रिलायन्सने ३४९ च्या प्लॅनची व्हॅलिडीटी बदलणार नाही असं स्पष्ट केलं होतं. हा प्रीपेड प्लॅन २८ दिवसांचा असून तेवढ्याच दिवसांचा महिना गृहित धरुन जाईल आणि एवढीच व्हॅलिडीटी दिली जाईल असं रिलायन्सने सांगितलं होतं.

तसेच गेल्या महिन्यामध्ये जीओने १ जीबी पर डेच्या प्लॅनची किंमत २०९ वरुन २४९ आणि दीड जीबी डेटा प्लॅनची किंमत ६६६ वरुन ७९९ केली होती. तसेच दिवसाला अडीच जीबीचा डेटा प्लॅनही २९९९ वरुन ३५९९ रुपयांचा केला होता.

रिलायन्स जिओच्या ३४९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केल्यानंतर, युजर्संना ३० दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. यापूर्वी हा रिचार्ज केल्यावर केवळ २८ दिवसांची व्हॅलिडीटी मिळत होती.

तसेच आता या प्लॅनअंतर्गत ५६ जीबी ऐवजी ६० जीबी डेटा दिला जाणार आहे. २जी डेटामध्ये कोणताही बदल न करता हा अतिरिक्त डेटा देण्यात आला आहे.

ज्या भागात Jio ने True 5G सेवा जारी केली आहे, तेथे अमर्यादित 5G इंटरनेट देखील मिळू शकणार आहे.