reliance jio vodafone idea and airtel daily 1gb data plan with unlimited calling prepaid plans
Unlimited कॉलिंगसह रोज १ जीबी डेटा मिळत असलेले पाहा स्वस्त रिचार्ज; किंमत १४८ रूपयांपासून By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 04:41 PM2021-05-10T16:41:31+5:302021-05-10T16:46:05+5:30Join usJoin usNext Prepaid Plan : पाहा या प्लॅन्समध्ये काय काय मिळतात बेनिफिट्स रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) या दूरसंचार कंपन्या निरनिराळ्या डेटासह ग्राहकांना बरेच प्लॅन ऑफर करतात. काही ग्राहकांना दररोज १ जीबी डेटाही पुरेसा असतो, तर काही ग्राहकांना दररोज ४ जीबीही डेटाची आवश्यकता असते. आज आपण ते प्लॅन्स जाणून घेऊया ज्याची किंमत कमी आणि त्यात थोडा डेटाही कमी. पाहूया Airtel, Reliance Jio आणि Vi चे स्वस्त आणि मस्त प्रीपेड प्लॅन्स, ज्यामध्ये अनलिमिटेज कॉलिंग आणि एसएमएसचीही सुविधा मिळते रिलायन्स जिओकडे दररोज १ जीबी डेटा देणारा केवळ एकच प्लॅन आहे. त्याची किंमत १४९ रूपये इतकी आहे. यामध्ये ग्राहकांना २४ दिवसांची वैधता आणि एकूण २४ जीबी डेटा देण्यात येतो. यामध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएसही दिले जातात. याशिवाय ग्राहकांना JioTV, JioCinema आणि JioNews सारख्या अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येतं. एअरटेलकडे असे दोन प्लॅन्स आहेत आणि त्याची किंमत १९९ आणि २१९ रूपये इतकी आहे. १९९ च्या प्लॅनची वैधता २४ दिवसांची आहे. तसंच २१९ रूपयांच्या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज १०० एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग देण्यात येतं. याशिलाय १ महिन्यासाठी प्राईम व्हिडीओचं मोबाईल एडिशन फ्री ट्रायल, Free Hellotunes, Wynk Music आणि Airtel Xstream ची मेंबरशीप दिली जाते. व्होडाफोन आयजियाकडे या प्रकारचे तीन प्लॅन्स आहेत. यामध्ये १४८, १९९ आणि २१९ रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. १२८ रूपयांच्या प्लॅनची वैधता १८ दिवसांची आहे. तर १९९ रुपयांच्या प्लॅनची वैधता २४ दिवस आणि २१९ रूपयांच्या प्लॅनची वैधता २८ दिवस आहे. या तिन्ही प्लॅन्समध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा देण्यात येते. १९९ आणि २१९ रूपयांच्या प्लॅनमध्ये Vi Movies & TV Basic चं सबस्क्रिप्शन देण्यात येतं. टॅग्स :स्मार्टफोनरिलायन्स जिओएअरटेलव्होडाफोनआयडियाइंटरनेटSmartphoneReliance JioAirtelVodafoneIdeaInternet