जिओची भन्नाट ऑफर, ३९९ रुपयांत ७५ जीबी डेटा अन् वर्षभर कॉलिंग By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 08:46 AM 2023-02-20T08:46:37+5:30 2023-02-20T08:51:51+5:30
दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी भन्नाट ऑफर घेऊन येतात. रिलायन्स जिओने (Jio)'व्हॅलेंटाईन डे २०२३' च्या खास प्रसंगी आपल्या यूझर्ससाठी एक उत्तम जिओ ऑफर सुरू केली होती. दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी भन्नाट ऑफर घेऊन येतात. रिलायन्स जिओने (Jio)'व्हॅलेंटाईन डे २०२३' च्या खास प्रसंगी आपल्या यूझर्ससाठी एक उत्तम जिओ ऑफर सुरू केली होती.
Jio च्या या ऑफर अंतर्गत, यूझर्सना कंपनीच्या निवडक प्लॅनसह चांगले फायदे ग्राहकांना मिळाले, ३४९ रुपयांचा, ८९९ किंवा मग २९९९ रुपयांच्या Jio प्लॅनवर अतिरिक्त डेटा, व्हॅलेडिटी आणि बरेच फायदे मिळवता आले.
आता, कंपनीने आणखी एक भन्नाट ऑफर लागू केली आहे. त्यानुसार, ग्राहकांना केवळ ३९९ रुपयांत ७५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. पण, पोस्टपेड ग्राहकांसाठी ही ऑफर आहे.
जिओकडून ३९९ रुपये, ५९९ रुपये आणि ७९९ रुपयांत फ्री मध्ये नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राइम व्हिडिओ सब्सक्रिप्शन ऑफर केले जाईल. हे तिन्ही प्लान पोस्टपेड प्लान आहेत.
जिओचा ३९९ रुपयाचा प्लान - जिओच्या या प्लानमध्ये ७५ जीबी डेटा ऑफर केला जातो. सोबत २०० जीबी डेटा ऑफर केला जात आहे. जर तुमचा डेटा संपल्यास तुम्हाला १० रुपये प्रति जीबी डेटा नुसार मिळतो.
या प्लानमध्ये कॉलिंग सोबत डेली १०० एसएमएसची सुविधा दिली जाते. तसेच, एक महिन्यासाठी नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन फ्री दिले जाते. सोबत एक वर्षासाठी अमेझॉन प्राइम व्हिडिओचं सब्सक्रिप्शन देण्यात येत आहे. Jio tv, jio security, jio cloud सब्सक्रिप्शन आहे.
जिओचा ५९९ रुपयाचा प्लान - या प्लानमध्ये एकूण १०० जीबी डेटा दिला जातो. सोबत २०० जीबी डेटा रोलओव्हरची सुविदा दिली जाते. तसेच, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० एसएमएसची सुविधा मिळते.
या प्लानमध्ये एक वर्षासाठी Amazon Prime Video सब्सक्रिप्शन दिले जाते. सोबत jio tv, jio security, jio cloud सब्सक्रिप्शन दिले जाते.