Reliance Jio चे सर्वात स्वस्त Data Plans; केवळ २२ रूपये खर्च करून महिनाभर चालणार इंटरनेट By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 06:48 PM 2021-08-18T18:48:42+5:30 2021-08-18T19:00:32+5:30
सध्या Reliance Jio, Airtel, Vodafone-Idea या कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी सातत्यानं काही नवनवे प्लॅन्स आणताना दिसत आहेत. नुकतंच जिओनं आपल्या ग्राहकांना कमी किंमतीचे प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत. सध्या Reliance Jio, Airtel, Vodafone-Idea या कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी सातत्यानं काही नवनवे प्लॅन्स आणताना दिसत आहेत. रिलायन्स जिओ आपल्या सामान्य ग्राहकांप्रमाणेच जिओ फोनच्या ग्राहकांसाठीही अनेक ऑफर्स आणताना दिसत आहे.
रिलायन्स जिओनं जिओ फोनसाठी काही निरनिराळ्या किंमतीचे अनेक प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत. या प्लॅनमध्ये एका लिमिटप्रमाणे डेटा देण्यात येतो. ज्या युझर्सना कमी डेटाची गरज य़आहे त्यांच्यासाठी कंपनीनं JioPhone Data Add On प्लॅनची सुविधा आणली आहे.
या द्वारे ग्राहकांना महिनाभर कोणत्याही डेली लिमिटशिवाय डेटाचा वापर करण्याची सुविधा देण्यात येते. पाहूया कोणते आहे रिलायन्स जिओ फोनचे सर्वात स्वस्त डेटा प्लॅन्स.
JioPhone डेटा प्लॅन्स जवळपास एका महिन्यापर्यंत चालतात. या सर्वांमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता देण्यात येते. २२ रूपयांच्या व्हाऊचरमध्ये ग्राहकांना २८ दिवसांसाठी २ जीबी डेटा देण्यात येतो.
या डेटाचा वापर २८ दिवसांच्या आत केव्हाही करता येऊ शकतो. प्लॅनमध्ये कॉलिंग आणि एसएमएससारखी आणखी कोणतीही सुविधा देण्यात येत नाही. हे कंपनीचं सर्वात स्वस्त JioPhone व्हाऊचर आहे.
२२ रूपयांच्या व्हाऊचरप्रमाणे ग्राहकांना ५२ रूपयांचं JioPhone डेटा प्लॅनही देण्यात येतो. याची वैधताही २८ दिवसांची आहे. परंतु यामध्ये कंपनीनं अधिक डेटा दिला आहे.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकून ६ जीबी डेटा देण्यात येतो. या डेटाचा वापर २८ दिवसांच्या आत केव्हाही करता येऊ शकतो. प्लॅनमध्ये कॉलिंग किंवा एसएमएससारखी कोणतीही सुविधा देण्यात येत नाही.
७२ रूपयांचा डेटा प्लॅन हा रिलायन्स जिओचा फोनचा सर्वात स्वस्त असलेला तिसरा डेटा प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता मिळते. तसंच यामध्ये ग्राहकांना डेली लिमिटच्या हिशोबानं डेटा देण्यात येतो.
७२ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज ५०० एमबी डेटा देण्यात येतो. याप्रकारे कंपनी एकूण १४ जीबी डेटा देते. विशेष म्हणजे हे सर्व प्लॅन्स रिलायन्स जिओ फोनमध्येच काम करतात.