Reliance Jio's new plane, you will get 3 GB of data every day rkp
Reliance Jioचा नवीन धमाका, दरदिवशी मिळणार ३ जीबी डेटा... By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 03:49 PM2020-05-15T15:49:59+5:302020-05-15T16:12:19+5:30Join usJoin usNext Reliance Jio ने प्रतिदिन ३ जीबी हायस्पीड डेटा असणारा नवीन प्लॅन आणला आहे. हा प्लॅन तीन महिन्यांसाठी आहे. याआधी कंपनीजवळ ८४ दिवसांची मर्यादा असलेला ५९९ रुपये आणि ५५ रुपयांचा प्लॅन आहे. Reliance Jioचा हा प्लॅन ९९९ रुपयांचा आहे. याची मर्यादा ८४ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला प्रतिदिन ३ जीबीपर्यंत डेटा मिळणार आहे. ९९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये डेटासोबत अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. याशिवाय, फ्री एसएमएस सुद्धा आहेत. व्हॉइस कॉल्स म्हणजे, जियो टू जिओ आणि लँडलाइन फ्री आहे. Reliance Jio च्या या प्लॅननुसार, जिओ नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी फक्त ३०० मिनिटे दिली आहे. प्रत्येक दिवशी ३ जीबी डेटा संपल्यानंतर इंटरनेचा स्पीड कमी होऊन ६४ Kbps इतका राहील. ९९९ रुपयांच्या या प्लॅनसोबत कंपनी जिओ अॅपचे कॉम्प्लिेंट्री सब्सक्रिप्शन सुद्धा देत आहे. एसएमएस लिमिट पाहिले तर प्रत्येक १०० एसएमएसची कॅपिंग ठेवली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अनेक जण घरातूनच काम करत आहेत. त्यामुळे Reliance Jio लाँग टर्म प्लॅनवर लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी Reliance Jioने वर्षासाठी वर्क फ्रॉम होमसाठी कस्टमाइज करून प्लॅन आणला आहे. गेल्या महिन्यात सोशल मीडिया जायंट असलेल्या फेसबुकने Reliance Jioमध्ये तब्बल 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात Reliance Jio आणि फेसबुक नवीन अॅपच्या माध्यमातून युजर्संना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. टॅग्स :रिलायन्स जिओमोबाइलरिलायन्सतंत्रज्ञानइंटरनेटReliance JioMobileReliancetechnologyInternet