Reliance Jio चा जबरदस्त प्लॅन; केवळ ३ रूपये जास्त देऊन मिळवा अधिक वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 08:36 PM2021-08-20T20:36:16+5:302021-08-20T20:40:16+5:30

Reliance Jio : रिलायन्स जिओ ही कंपनी सातत्यानं काही नवे प्लॅन्स बाजारात लाँच करत असते. सध्या देशातील Airtel, Reliance Jio, Vodafone-Idea या कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सुरू आहे स्पर्धा.

सध्या Airtel, Reliance Jio, Vodafone-Idea या कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी निरनिराळे प्लॅन्स किंवा ऑफर्स सातत्यानं लाँच करत असतात.

देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी आणि नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सातत्यानं नवनवे प्लॅन्स बाजारात लाँच करत असते. कंपनीने अलीकडेच ५ नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत.

रिलायन्स जिओचे हे प्लॅन कोणत्याही डेटा मर्यादेशिवाय येतात. यापैकी एक प्लॅन ४४७ रुपयांचा आहे, जो दोन महिन्यांच्या वैधतेसह येतो. याशिवाय, कंपनी यापूर्वीपासून ४४४ रुपयांचा दुसरा प्लॅन ऑफर करत आहे.

या प्लॅन्सच्या किमतीत फारसा फरक नाही. दोन्ही प्लॅन्समध्ये केवळ ३ रुपयांचा फरक आहे. दोन्ही प्लॅन्सच्या किंमती जवळपास सारख्याच असल्यानं कोणता प्लॅन घ्यावा याबाबत ग्राहकांना प्रश्न असतो. पाहूया दोन्ही प्लॅनमध्ये काय आहे फरक.

रिलायन्स जिओच्या ४४४ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ५६ दिवसांची वैधता देण्यात येते. तसंच या प्लॅनसोबत ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा देण्यात येतो. याप्रमाणे ग्राहकांना एकूण ११२ जीबी डेटा देण्यात येतो.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसही देण्यात येतात. याशिवाय JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप्सचं सबस्क्रिप्शनही मिळते.

४४७ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ६० दिवसांची वैधता मिळते. तसंच एकूण ५० जीबी डेटा देण्यात येतो. हा डेटा कोणत्याही मर्यादेसह ग्राहकांना वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.

या प्लॅनसोबत ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस देण्यात येतात. तसंच याशिवाय ग्राहकांना JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.

पाहिलं तर दोन्ही प्लॅन्सची किंमत जवळपास सारखीच आहे आणि वैधतादेखील सारखीच आहे. परंतु ४४७ रूपयांच्या प्लॅनमध्ये ३ रुपये अतिरिक्त देऊन तुम्हाला ४ दिवसांची अतिरिक्त वैधता मिळते.

४४७ रूपयांच्या प्लॅनमध्ये जरी डेटा कमी मिळत असला तरी तुम्ही तुमच्या गरजेनुसार तो वापरू शकता. तुम्हाला हवा असल्यास एका दिवसातही तो डेटा संपवण्याची तुम्हाला मुभा देण्यात आली आहे.