Reliance Jio चे टॉप ५ ट्रेंडिंग प्लॅन्स; मिळणार ९१२ जीबी डेटा; Disney+ Hotstar आणि बरंच काही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 10:41 PM2022-04-08T22:41:47+5:302022-04-08T22:46:19+5:30

Reliance Jio : पाहा या प्रीपेड प्लॅन्समध्ये कोणते मिळतायत बेनिफिट्स आणि काय आहे विशेष.

Reliance Jio : रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी अनेक उत्तम प्रीपेड प्लॅन्स ऑफर करते. या प्लॅनमध्ये काही असेही रिचार्ज देखील आहेत, ज्याला कंपनी टॉप ट्रेंडिंग प्लॅन म्हटलं जातं.

कंपनीच्या वेबसाइटवरील टॉप ट्रेंडिंग प्लॅनच्या यादीमध्ये एकूण पाच प्लॅन्सचा समावेश आहे. या प्लॅन्समध्ये, कंपनी 912.5GB पर्यंत डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि Disney + Hotstar चं सबस्क्रिप्शन ऑफर करत आहे. याची वैधता एक वर्षापर्यंत आहे.

जिओचा 299 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 2 GB नुसार एकूण 56 GB डेटा ऑफर करते. प्लॅनमध्ये, तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचा लाभ देण्यात येतो. तसंच या प्लॅनसोबत दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतील. या प्लॅनसोबत ग्राहकांना जिओ अॅप्सचं देखील सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे.

84 दिवसांची वैधता असलेल्या 666 रुपयांच्या या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 1.5 GB नुसार एकूण 126 GB डेटा मिळेल. प्लॅनमध्ये, कंपनी दररोज 100 मोफत एसएमएससह अमर्यादित कॉलिंग देखील देत आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Jio अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे.

जिओच्या 719 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांची वैधता मिळेल. इंटरनेट वापरण्यासाठी, तुम्हाला या प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा देण्यात येतो. प्लॅनमध्ये, कंपनी देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग देखील देत आहे. दररोज 100 मोफत एसएमएस असलेल्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शनही मिळेल.

Jio त्याच्या टॉप ट्रेंडिंग प्लॅन्सच्या यादीमध्ये सध्याच्या Rs 499 आणि Rs 2999 च्या प्लॅनमध्ये Disney + Hotstar चं सबस्क्रिप्शन देत आहे. कंपनीनं हे क्रिकेट प्लॅनही असल्याचं म्हटलंय. दोन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग मिळेल. याशिवाय हे दोन्ही प्लॅन्समध्ये जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही मिळतं.

499 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज 2 जीबी डेटा देते. या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे. जर कंपनीच्या 2999 रुपयांच्या प्लॅनबद्दल सांगायचे झाले तर यात 365 दिवसांची वैधता मिळते. यामध्ये तुम्हाला दररोज 2.5 GBनुसार एकूण 912.5 GB डेटा मिळेल.