जगातील टॉप 100 मध्ये केवळ 2 भारतीय कंपन्या, अंबानींची रिलायन्स देशात नंबर 1

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 09:14 PM2020-07-23T21:14:07+5:302020-07-23T21:24:00+5:30

जगातील टॉप 50 मध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीला स्थान मिळाले असून टॉप 100 मध्ये टाटांच्या टीसीएसची गिनती झाली आहे

रिलायन्स उद्योग समूहाचे चेयरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या संपत्तीत गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढ होत आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीचे बाजार मुल्यांकन 13 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. त्यामुळे रिलायन्स जगातील 48 वी सर्वात श्रीमंत कंपनी बनली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज ही कच्चे तेल, रिफायनरी, पेट्रोकेमिकल रसायन, आणि दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असलेली जगातील प्रमुख कंपनी आहे.

शेअर बाजारातील आकड्यांच्या आधारे रिलायन्स ही जगातील 48 वी सर्वात श्रीमंत कंपनी आहे. या यादीत 1700 अब्ज डॉलरच्या बाजार मुल्यांकनासह सऊदी अरामको ही जगातील सर्वात श्रीमंत कंपनी ठरली आहे.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अॅपल, तर पुढे अनुक्रमे मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन आणि गुगलचा क्रमांक लागतो. गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर बीएसईवर 2.82 टक्क्यांनी वाढून 2060.65 वर पोहोचला आहे.

रिलायन्सने नुकतेच जारी केलेल्या राईट इश्यू आणि इतर शेअर्संमध्ये वेग-वेगळा व्यवसाय झाला आहे. कंपनीचं एकूण बाजार मुल्य 13 लाख कोटी किंवा 181 अब्ज डॉलर एवढे आहे.

आजपर्यंत कुठल्याही भारतीय कंपनीने बाजार मुल्यांकनामध्ये एवढ्या रकमेपर्यंत मजल मारली नाही. त्यामुळे रिलायन्स ही भारताची एकमेव कंपनी ठरली आहे.

रिलायन्सचे बाजार मुल्यांकन शेवरॉन कंपनीच्या 170 अब्ज डॉलरच्या बाजार मुल्यांकनापेक्षा अधिक आहे. युनिलिवर, ओरेकल, बँक ऑफ चायना, बीएसपी ग्रुप, रॉयल डट शैल आणि सॉफ्ट बँकेची रँकींगही रिलायन्सपेक्षा कमी आहे.

आशियातील कंपन्यांमध्ये रिलायन्स पहिल्या 10 मध्ये असून चीनची अलिबाबा ही कंपनी जगभरात 7 व्या स्थानावर आहे. जगातील पहिल्या 100 कंपन्यांमध्ये रिलायन्स 48 व्या स्थानी असून टाटा यांच्या टीसीएसनेही स्थान मिळवले आहे. टीसीएसचे बाजार मुल्यांकन 8.14 लाख कोटी आहे.

मुकेश अंबानी आता जगातील सर्वात धनाढ्य व्यक्तींच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांनी जगातील प्रख्यात गुंतवणूकदार आणि बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरन बफे यांना मागे टाकलं आहे.

Read in English