Zomato IPO: झोमॅटोचा ९,३७५ कोटी रूपयांचा IPO सबस्क्रिप्शनसाठी ओपन; पाहा काय म्हणतायत जाणकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 12:14 PM2021-07-14T12:14:48+5:302021-07-14T12:24:44+5:30

Zomato IPO: आयपीओद्वारे मिळणार कमाईची संधी. आयपीओ येण्यापूर्वीच झोमॅटोनं अँकर गुंतवणूकदारांकडून जमवले ४१९६.५१ कोटी रूपये.

फुड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचा (Zomato) आयपीओ १४ जुलै रोजी लाँच झाला आहे. दरम्यान, या निमित्तानं शेअर बाजारात गुंतवणूक करण्याऱ्यांसाठी मोठी संधी आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) देखील यासाठी बोली लावण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. एलआय़सी गैर सरकारी कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे लावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

९३७५ कोटी रूपयांचा हा झोमॅटोचा आयपीओ आहे. या आयपीओसाठी गुंतवणूकदारांना १६ जुलैपर्यंत बिड करता येईल. तसंच आयपीओ येण्यापूर्वी कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून ४१९६.५१ कोटी रूपये जमवले.

शेअर बाजाराच्या वेबसाईटवर असलेल्या पत्रकानुसार कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून ७६ रूपये प्रति शेअर या दरानं ५५,२१,७३,५०५ इक्विटी शेअर्स देण्याचा निर्मय घेतला आहे. ९,३७५ कोटी रूपयांच्या या आयपीओ अंतर्गत ९ हजार कोटी रूपयांचे नवे इक्विटी शेअर्स इश्यू करण्यात येतील.

याशिवाय उर्वरित ३७५ कोटी रूपयांचे शेअर्स नोकरी डॉट कॉमची पॅरेंट कंपनी इन्फो एज (इंडिया) द्वारे ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत इश्यू केले जातील.

झोमॅटोनं आयपीओसाठी ७२-७६ रूपयांचा प्राईस बँड निश्चित केला आहे. तसंच प्रति शेअर फेस व्हॅल्यू १ रूपया इतकी आहे. बिडसाठी गुंतवणूकदारांना कमीतकमी १९५ शेअर्ससाठी बोली लावावी लागेल. यासाठी अपर प्राईस बँडनुसार गुंतवणूकदारांना १४,८२० कोटी रूपयांची गुंतवणूक करावी लागेल.

फ्रेश इश्यूद्वारे मिळालेल्या फंडला कंपनी ऑर्गेनिक आणि इन ऑर्गेनिक ग्रोथ इनिशिएटिव्ह्स आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठई गुंतवणार आहे. कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होतील.

मोतीलाल ओस्वाल फायनॅन्शिअल सर्व्हिसेसनं लिस्टिंग गेन्ससाठी सबस्क्राईबचं रेटिंग दिलं आहे. तर व्हेंच्युरा सिक्युरिटीजनं यासाठी कोणतंही रेटिंग दिलेलं नाही. अॅक्सिस सिक्युरिटीज आणि जेएसटी इन्व्हेस्टमेंटनं कोणतंही रेटिंग दिलेलं नाही.

आर्थिक वर्ष २०२० मध्ये झोमॅटोला २,७४२ रूपयांचं उत्पन्न मिळालं होतं. तर महासाथीदरम्ंयान कंपनीला १,३६७ कोटी रूपयांचं उत्पन्न मिळालं.

सध्याही कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. फंड रेझिंगनंतर झोमॅटोचं व्हॅल्युएशन ५४० कोटी डॉलर्स म्हणजेच ४०.४ कोटी रूपये इतकं झालं आहे.

काही दिवसांपूर्वी कंपनीमध्ये टायगर ग्लोबल, फिडेलिटी आणि कोरा मॅनेजमेंटसह काही गुंतवणूकदारांनी झोमॅटोमध्ये २५ कोटी डॉलर्स (१८७० कोटी रूपये) गुंतवणूक केली होती.

कोणत्याही कंपनीला आपला आयपीओ आणण्यापूर्वी ही कागदपत्रे सेबीकडे जमा करून त्याची मंजुरी घेणं आवश्यक असतं. आयपीओ आणण्यासाठी Zomato नं एप्रिल महिन्यात आपल्या कंपनीला प्रायव्हेट कंपनीमधून पब्लिक कंपनीमध्ये बदलण्याचं काम केलं आहे.

यासाठी झोमॅटोनं आपल्या कंपनीचं नाव बदलून Zomato Limited वरून Zomato Private Limited असं केलं आहे. आयपीओ आणण्यापूर्वीच Zomato नं फेब्रुवारी महिन्यात टायगर ग्लोबल, कोरा आणि अन्य कडून २५ कोटी डॉलर्सचं फंडिंग जमवलं होतं. यासाठी कंपनीची मार्केट व्हॅल्यू ५.४ अब्ज डॉलर्स इतकी ठरवण्यात आली होती.

कोटक महिंद्रा लिमिटेड, मॉर्गन स्टॅनले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि क्रेड सुइस सिक्युरिटिज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी आयपीओचे ग्लोबल को-ऑर्डिनेटर्स आणि लीड मॅनेजर्स असतील.

Zomato मध्ये चीनच्या Ant Group नं मोठी गुंतवणूक केली आहे. हा समुह जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाशी निगडीत आहे. यामध्ये जॅक मा यांची गुंतवणूक आहे.