Retirement Planning: रिटायरमेंटवर हवेत ₹५,००,००,०००? कितव्या वयापासून आणि किती रुपयांची करावी लागेल SIP? पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 09:53 AM 2024-06-07T09:53:07+5:30 2024-06-07T10:00:11+5:30
Retirement Planning: आजच्या काळात तुम्ही कितीही पैसे कमवत असाल तरी वृद्धापकाळातली चिंता आजही सर्वांनाच सतावते. रिटायरमेंट नंतर तरी आपण आरामाचं जीवन जगावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. यासाठी मोठी रक्कम कशी जमवायची हे आपण पाहू. आजच्या काळात तुम्ही कितीही पैसे कमवत असाल तरी वृद्धापकाळातली चिंता आजही सर्वांनाच सतावते. रिटायरमेंट नंतर तरी आपण आरामाचं जीवन जगावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. आरामदायी जीवनासाठी पैशाची गरज असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी पैसा ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला तुमच्या छोट्या छोट्या गरजांसाठी कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही.
तुम्हालाही रिटायरमेंटनंतर आरामानं जीवन जगायचं असेल तर वेळीच गुंतवणूक सुरू करा. आजच्या काळात एसआयपी म्युच्युअल फंड हा एक असा पर्याय आहे जो आपली गुंतवणूक वेगानं वाढवू शकतो. यामध्ये दीर्घकाळात मोठा परतावा मिळतो, जो कोणत्याही सरकारी स्कीममध्ये मिळणं कठीण आहे. एसआयपीच्या माध्यमातून ५ कोटींचा फंड जमा करायचा असेल तर कोणत्या वयात किती वयात एसआयपी सुरू करावी याबद्दल माहिती जाणून घेऊ.
जर तुमचं वय २५ वर्षे असेल तर ही तुमच्यासाठी गुंतवणूकीची योग्य वेळ आहे. अशा वेळी तुम्ही दीर्घ काळासाठी गुंतवणूक करू शकता आणि तुम्हाला मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नाही. जर तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी ८,००० रुपयांची एसआयपी सुरू केली तर तुम्हाला ती ३५ वर्षे चालवावी लागेल.
३५ वर्षांनंतर तुम्ही ६० वर्षांचे व्हाल. जर तुम्ही ३५ वर्षांसाठी ८,००० रुपयांची एसआयपी चालवत असाल तर तुमची एकूण गुंतवणूक ३३,६०,००० रुपये होईल. एसआयपीवरील सरासरी परतावा १२ टक्के मानला जातो. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर व्याज म्हणून ४,८६,०२,१५३ रुपये मिळतील. अशा प्रकारे वयाच्या ६० व्या वर्षी तुम्ही ५,१९,६२,१५३ रुपयांचे मालक व्हाल.
वयाच्या ३० व्या वर्षी एसआयपी सुरू करायची असेल तर ती कमीत कमी ३० वर्षे चालवावी लागेल. अशा वेळी मुदत कमी झाल्यानं गुंतवणुकीची रक्कमही वाढवावी लागणार आहे. जर तुम्ही सलग ३० वर्षे एसआयपीमध्ये दरमहा १५,००० रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही ५४,००,००० रुपयांची गुंतवणूक कराल. १२ टक्के दरानं तुम्हाला ४ कोटी ७५ लाख ४८ हजार ७०७ रुपये व्याज मिळतील. ३० वर्षांनंतर तुम्ही एकूण ५,२९,४८,७०७ रुपयांचे मालक व्हाल.
जर तुम्ही वयाच्या ३५ व्या वर्षी गुंतवणूक करत असाल आणि २५ वर्षात ५ कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्हाला सलग २५ वर्ष दरमहा चांगली मोठी रक्कम गुंतवावी लागेल. यासाठी तुम्हाला दरमहा एसआयपीमध्ये २७,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तुमचं उत्पन्न किमान ८० हजार ते १ लाख रुपयांच्या आसपास असेल तरच तुम्ही हे करू शकता.
जर तुम्ही सलग २५ वर्षे २७,००० रुपयांची गुंतवणूक केली तर २५ वर्षांत तुम्ही एकूण ८१,००,००० रुपयांची गुंतवणूक कराल. यावर तुम्हाला ४,३१,३६,१४७ रुपये व्याज म्हणून मिळतील आणि वयाच्या ३० व्या वर्षी तुम्ही एकूण ५,१२,३६,१४७ रुपयांचे मालक व्हाल.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. एसआयपीतील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधिन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)