Harmanpreet Singh Hockey Player : देशातील सर्वात श्रीमंत हॉकी खेळाडूंपैकी एक आहे हरमनप्रीत सिंग; कुठून होते 'सरपंच साहेबां'ची कमाई? जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 08:56 AM 2024-08-09T08:56:28+5:30 2024-08-09T09:04:30+5:30
Indian Hockey Player Harmanpreet Singh : भारतीय हॉकी संघाने २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात संघानं स्पेनचा २-१ असा पराभव करत ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरं कांस्य पदक पटकावलं. भारतीय हॉकी संघाने २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात संघानं स्पेनचा २-१ असा पराभव करत ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरं कांस्य पदक पटकावलं. याआधी टोक्यो ऑलिम्पिकमध्येही भारतीय हॉकी संघ कांस्य पदक विजेता ठरला होता.
ऑलिम्पिकमधील पुरुष हॉकीमध्ये भारताचे हे १३ वं आणि ५२ वर्षांनंतर सलग दुसरं पदक ठरलं. हरमनप्रीत सिंगची गणना जगातील सर्वोत्तम ड्रॅग फ्लिकर्समध्ये केली जाते. लोक त्यांना 'सरपंच साहेब' या नावानेही हाक मारतात. भारतातील सर्वात श्रीमंत हॉकीपटूंमध्ये त्याची गणना होते. त्याच्याकडे किती संपत्ती आहे आणि त्याच्या उत्पन्नाचे स्त्रोत काय आहेत हे आपण जाणून घेऊ.
हरमनप्रीत सिंग हा भारतातील सर्वात श्रीमंत हॉकीपटूंपैकी एक असून त्याची संपत्ती ५० लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे ४२ कोटी रुपये आहे. तो २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा कर्णधार आहे. त्याचं हे तिसर ऑलिम्पिक आहे.
हरमनप्रीत सिंगनं २०१५ मध्ये जपानविरुद्धच्या सामन्यात भारताकडून सीनियर डेब्यू केला होता. त्यानंतर २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्येही त्यानं देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं. २०२२-२०२३ प्रो लीग हंगामापूर्वी त्याची कर्णधारपदी निवड करण्यात आली होती.
हरमनप्रीत सिंगची संपत्ती प्रामुख्याने त्याची आंतरराष्ट्रीय हॉकी कारकीर्द आणि हॉकी इंडिया लीगमधील सहभागामुळे येते. २०१५ च्या लीग हंगामात त्याला दबंग मुंबईनं ५१,००० डॉलर (सुमारे ४२ लाख रुपये) मध्ये आपल्या संघात समाविष्ट केलं होतं. हरमनप्रीत सिंगनं पाच गोल करत आपला ठसा उमटवला. स्पर्धेतील 'मोस्ट प्रॉमिसिंग प्लेयर' म्हणून त्याला २०१५ च्या पॉन्टी चड्ढा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
काही अन्य खेळांप्रमाणे भारतीय राष्ट्रीय हॉकीपटूंचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स नसतात. त्याऐवजी ते ज्या संघांचं आणि संघटनांचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्यावतीनं त्यांना पैसे दिले जातात. याशिवाय मोठ्या स्पर्धांमध्ये कामगिरी केल्याबद्दल खेळाडूंना बक्षिसाची रक्कम दिली जाते. उदाहरणार्थ, २०२० टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाच्या प्रत्येक सदस्याला पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डानं १५ लाख रुपये आणि इतर अनेक बक्षिसं दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिसमध्ये भारतीय हॉकी संघाला फोन करून सलग दुसरं ऑलिम्पिक कांस्य पदक पटकावल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आणि हरमनप्रीत सिंगला 'सरपंच साहेब' असंही संबोधलं. त्यावेळी सर्व खेळाडू आणि खुद्द पंतप्रधानांच्या चेहऱ्यावरही हसू आलं.