Royal Families of World: जगातील सर्वाधिक श्रीमंत एलन मस्क नाहीतच मुळी, ही पाच राजघराणी; तिप्पट, चौपट संपत्ती...पण By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 08:05 PM 2022-09-09T20:05:40+5:30 2022-09-09T20:11:42+5:30
Queen Elizabeth II ही राजघराणी आजही जगावर हुकूमत गाजवतात... एक तर अवघ्या जगावर राज्य करत होते... जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती कोण? असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही टेस्लाचे मालक एलन मस्क यांचे नाव घ्याल. त्यापूर्वी अॅमेझ़ॉनचे जेफ बेझोस, बिल गेट्स आदी. पण तुम्हाला माहितीये का एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत नाहीत. या पाच राजघराण्यांसमोर एलन मस्क यांच्या संपत्तीचा आकडाही फिका पडेल, यात ब्रिटनचे राजघराणे देखील येते.
सौदीचा राजा आणि त्याचे राजघराणे जगातील सर्वात श्रीमंत आहेत. त्यांची संपत्ती 1.4 ट्रिलियन डॉलर्स एवढी म्हणजेच १११ लाख कोटी रुपये एवढी आहे. एलन मस्क यांच्यापेक्षा किती, असा प्रश्न पडला असेल तर सौदीचा राजा असे चार एलन मस्क खिशात ठेवेल एवढी. महत्वाची बाब म्हणजे जगातील पहिल्या पाच सर्वाधिक श्रीमंत राजघराण्यांपैकी पाच राजघराणी ही अरबांची आहेत.
कुवेतचे राजघराणे जगातील दुसरे सर्वात श्रीमंत राजघराणे आहे. ते १७५२ पासून कुवेतवर राज्य करत आहेत. सध्या या राजघराण्याचे प्रमुख शेख सबाह अहमद अल जाबर अल सबाह हे आहेत. या शाही परिवाराने अमेरिकेच्या सर्व मोठमोठ्या ब्ल्यू चिप कंपन्यामध्ये पैसे गुंतवून अगणित संपत्ती कमविली आहे. या परिवाराकडे ३६० अब्ज डॉलर्सची मालमत्ता आहे. म्हणजे मस्क यांच्यापेक्षा १०० अब्ज डॉलर्स एवढी जास्त.
यानंतर तिसरा क्रमांक लागतो तो कतर राजघराण्याचा. कतरवर १९ व्या शतकापासून थानी राजघराण्याची सत्ता आहे. शेख तमीम बिन हमद अल थानी हे २०१३ मध्ये राजगादीवर विराजमान झाले आहेत. या राजघराण्याकडे 335 अब्ज डॉलर्सची मालमत्ता आहे. त्यांनी अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये लंडनचा Shard skyscraper, ऑलिंपिक व्हिलेज, Harrod चे डिपार्टमेंट स्टोअर आदी आहेत. याचबरोबर न्यूयॉर्कची Empire State Building, Barclays, British Airways आणि Volkswagen मध्ये देखील प्रचंड मोठी गुंतवणूक आहे.
अबू धाबीच्या राजघराण्याचा चौथा क्रमांक लागतो. तिथे नाह्यान राजघराण्याची सत्ता आहे. शेख खलीफा बिन जायद अल नाह्यान हे तिथे राजगादीवर आहेत. ते २००४ पासून युएईचे अध्यक्ष आहेतच, परंतू अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष देखील आहे. या अथॉरिटीची ६९६ अब्ज डॉलर्सच्या मालमत्ता आहेत. या रॉयल फॅमिलीकडे 150 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. एकूण संपत्ती पाहता एलन मस्क कुठेच नाहीत. या राजघराण्याला कच्च्या तेलातून प्रचंड पैसा मिळतो.
ब्रिटनचे राजघराणे पाचव्या स्थानी ब्रिटिश रॉयल फॅमिलीचे नेतृत्व क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्या हाती होती. आता त्यांचे ज्येष्ट पूत्र चार्ल्स राजा बनणार आहेत. हे राजघराणे जगातील पाचव्या स्थानावर असले तरी जगातील सर्वाधिक प्रभावशाली राजघराणे आहे. एकेकाळी हे राजघराणे जगावर राज्य करत होते. फोर्ब्सनुसार या राजघराण्याकडे ८८ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. या राजघराण्यांची मालमत्ता ही त्यांच्या वारसांमध्ये विखुरलेली आहे. यामुळे ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत येत नाहीत. ही माहिती therichest.com ने दिली आहे.