rtgs facility becomes operational 24 hours seven days from 14 december
RBI चा मोठा निर्णय, आता 24 तास उपलब्ध असणार बँकांची 'ही' सुविधा, आज रात्रीपासून होणार सुरुवात By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 03:58 PM2020-12-13T15:58:22+5:302020-12-13T16:28:05+5:30Join usJoin usNext जर तुम्ही डिजिटल व्यवहार करत असल्यास तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंटची (RTGS) सुविधा उद्यापासून 24 तास म्हणजेच प्रत्येकवेळी उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. ही सेवा ग्राहकांना 14 डिसेंबरला रात्री 12:30 वाजल्यापासून 24 तास उपलब्ध असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, 14 डिसेंबरपासून आरटीजीएसची सुविधा 24 तास उपलब्ध असेल. याचा अर्थ असा की तुम्ही आरटीजीएसद्वारे कधीही पैसे ट्रान्सफर करू शकता. यामुळे भारत या देशांमध्ये सामील होईल, जेथे ही सुविधा दिवसरात्र कार्यरत आहे. कोरोना काळात ऑनलाइन ट्रान्जक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यानंतर आरबीआयने आरटीजीएस सुविधा 24 * 7 तास देण्याचे निश्चित केले. भारतीय वित्तीय बाजाराच्या जागतिक एकीकरणाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी आरबीआयने आरटीजीएसची वेळ वाढविण्याचा निर्णय घेतला होता, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. आरटीजीएस डिजिटल फंड ट्रान्सफर करण्याची एक पद्धत आहे. आरटीजीएसच्या मदतीने कमी वेळात पैसे ट्रान्सफर केले जातात. आरटीजीएसचा वापर मुख्यतः मोठ्या प्रमाणात ट्रान्सफरसाठी केला जातो. याअंतर्गत किमान 2 लाख रुपये पाठविले जाऊ शकतात. जास्तीत जास्त रक्कम पाठविण्याची मर्यादा 10 लाख रुपये आहे. आरटीजीएसमार्फत 2 लाख ते 5 लाखांपर्यंत निधी ट्रान्सफर करण्यासाठी आरबीआयने जास्तीत जास्त 24.5 रुपये शुल्क ठेवले आहे आणि 5 लाखाहून अधिक निधी ट्रान्सफर करण्यासाठी बँक जास्तीत जास्त 49.5 रुपये शुल्क आकारू शकते. यावर जीएसटीदेखील भरावा लागतो. दरम्यान, देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय आरटीजीएससाठी कोणतेही शुल्क घेत नाही. आरटीजीएसची सुरुवात 26 मार्च 2004 मध्ये झाली होती. त्यावेळी या सेवेशी फक्त 4 बँका संबंधित होत्या. परंतु आता देशातील सुमारे 237 बँका या प्रणालीद्वारे दररोज 4.17 लाख कोटी रुपयांचे व्यवहार पूर्ण करतात. नोव्हेंबरमध्ये आरटीजीएसकडून सरासरी व्यवहाराची रक्कम 57.96 लाख रुपये होती. सध्या आरटीजीएसच्या मदतीने दुसर्या आणि चौथा शनिवार वगळता महिन्याच्या सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत निधी ट्रान्सफर केला जातो. याआधी आरबीआयने एनईएफटीचे (NEFT) नियमांमध्ये बदल केले होते. एनईएफटीची सुविधा डिसेंबर 2019 पासून 24 तास उपलब्ध आहे. एनईएफटी देखील पेमेंटची एक पद्धत आहे. मात्र, यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया काही काळानंतर पूर्ण केली जाते.टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकडिजिटलऑनलाइनपैसाReserve Bank of IndiabankdigitalonlineMONEY