Rule Change 1st August : आजपासून देशभरात लागू झाले हे ६ मोठे बदल; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 12:33 PM2024-08-01T12:33:33+5:302024-08-01T12:41:40+5:30

जुलैचा महिना संपला असून आजपासून ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली आहे. देशात पहिल्या तारखेपासून (Rule Change From 1st August) अनेक मोठे बदल लागू करण्यात आले आहेत.

जुलैचा महिना संपला असून आजपासून ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली आहे. देशात पहिल्या तारखेपासून (Rule Change From 1st August) अनेक मोठे बदल लागू करण्यात आले आहेत. हे असे बदल आहेत जे आपल्या घराच्या किचनपासून ते आपल्या बँकेशी संबंधित आहेत. एकीकडे एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करण्यात आला असताना एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डाचे (HDFC Bank Credit Card Rule Change) फास्टॅगचे (FasTag Rule Change) नवे नियम लागू झाले आहेत. जाणून घेऊया अशाच ६ मोठ्या बदलांबद्दल...

एलपीजीचे दर बदलले - आजपासून ऑगस्ट महिना सुरू झाला असून १ ऑगस्ट २०२४ रोजी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. इंधन कंपन्यांनी अर्थसंकल्पानंतर एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. यंदाही १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात (Commercial LPG Cylinder Price) बदल करण्यात आला आहे. तर १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती यंदाही तशाच आहेत. व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आजपासून ८.५० रुपयांनी महागलाय.

इन्कम टॅक्स - पहिल्या तारखेपासून लागू होणारा दुसरा बदल इन्कम टॅक्सशी संबंधित आहे, खरं तर जर तुम्ही ३१ जुलै २०२४ पर्यंत तुमचा आयटीआर भरला नसेल तर तुमच्याकडून आता दंड आकारला जाणार आहे. आयकर विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करदाते वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजेच ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत बिलेटेड रिटर्न दाखल करू शकतात. जर तुमचं उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर १ हजार रुपये आणि जर तुमचं उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर आयटीआर भरण्यासाठी ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

एचडीएफसी क्रेडिट कार्ड - एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे क्रेड, पेटीएम, मोबिक्विक, फ्रीचार्ज आणि इतर थर्ड पार्टी अॅप्सवरून रेंट पेमेंट केलं तर त्या व्यवहारावर १ टक्के शुल्क आकारलं जाईल आणि यासाठी व्यवहाराची मर्यादा प्रत्येकी ३ हजार रुपये निश्चित करण्यात आलीये. १५,००० रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर एकूण रकमेवर १ टक्के शुल्क आकारलं जाईल.

गुगल मॅप्स - जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनने आपल्या गुगल मॅप्स सेवेवर भारतात आकारलं जाणारं शुल्क ७० टक्क्यांनी कमी केलं आहे. याशिवाय गुगल आपली मॅप सर्व्हिसही डॉलरऐवजी भारतीय रुपयात देणार आहे.

१३ दिवस बँका बंद - बँकेशी संबंधित कोणतंही काम असेल तर घराबाहेर पडण्यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या बँक हॉलिडे लिस्टवर एक नजर टाका. ऑगस्ट बँक हॉलिडे लिस्टनुसार संपूर्ण महिन्यात १३ दिवस बँका बंद राहतील. रक्षाबंधन, जन्माष्टमी, स्वातंत्र्य दिन अशा विविध दिवशी बँका बंद राहतील. या सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारी येणाऱ्या साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे.

फास्टॅग - वाहन चालवणाऱ्यांसाठीही आजपासून फास्टॅगचे नवे नियम लागू होणार आहेत. वास्तविक, फास्टॅग केवायसी प्रक्रिया १ ऑगस्ट २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान पूर्ण करावी लागेल. यामुळे वाहनचालकांना आता आपला तीन वर्षांहून अधिक जुना फास्टॅग बदलून नवीन फास्टॅग घ्यावा लागणार आहे.