२०२१ मध्ये कोणाचा पगार किती वाढणार? जाणून घ्या सविस्तर

By कुणाल गवाणकर | Published: November 19, 2020 10:41 PM2020-11-19T22:41:26+5:302020-11-19T22:46:02+5:30

कोरोनामुळे यंदाचं वर्ष वाया गेलं. कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था संकटात सापडली. त्यामुळे कोट्यवधी लोकांचे रोजगार गेले. याशिवाय अनेकांच्या पगारात कपात झाली.

कोरोनामुळे झालेल्या नुकसानामुळे अनेक कंपन्यांनी यंदा पगारवाढ दिलेली नाही. त्यामुळे आता पगारदारांचं लक्ष पुढील वर्षाकडे लागलं आहे.

२०२१ वर्ष आशिया खंडातील कर्मचाऱ्यांसाठी चांगलं ठरेल, असा अंदाज कन्सल्टन्सी फर्म ईसीए इंटरनॅशनलनं व्यक्त केला आहे.

जगाच्या इतर देशांच्या तुलनेत आशिया खंडातील कर्मचाऱ्यांचा पगार जास्त वाढणार असल्याचा अंदाज ईसीए इंटरनॅशनलनं वर्तवला आहे.

आशियातल्या कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीची सरासरी गेल्या वर्षीच्या ३.२ टक्क्यांच्या तुलनेत ४.३ टक्के राहील, असं ईसीए इंटरनॅशनलनं म्हटलं आहे.

आशिया खंडातील इंडोनेशियातल्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगारवाढ मिळेल असा अंदाज आहे. देशातल्या कर्मचाऱ्यांना पुढील वर्षी सरासरी ३.८ टक्के पगारवाढ मिळू शकेल. २०२० मध्ये कर्मचाऱ्यांना सरासरी २.६ टक्के पगारवाढ मिळाली होती.

या यादीत इस्रायल सरासरी २.८ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. सिंगापूर, थायलंडमधील कर्मचाऱ्यांना २.७ टक्के पगारवाढ मिळू शकेल.

भारत या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. भारतातील कर्मचाऱ्यांना २.३ पगारवाढ मिळू शकेल, असा ईसीए इंटरनॅशनलचा अंदाज आहे.

ईसीए इंटरनॅशनलनं ६८ देशांमधील ३७० कंपन्यांमधील व्यवस्थापनांशी संपर्क साधून पगारवाढीची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

कोरोना संकटानंतरही आशियाई खंडातल्या देशांची उत्पादकता वाढली असल्यानं कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळेल, असं ईसीए इंटरनॅशनलनं अहवालात म्हटलं आहे.