Save 45 rupees daily and get 25 lakh rupees Know what is the scheme of LIC
रोज करा ४५ रुपयांची बचत मिळतील २५ लाख रुपये; जाणून घ्या काय आहे LIC ची योजना By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 03:02 PM2023-10-13T15:02:25+5:302023-10-13T15:21:00+5:30Join usJoin usNext एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी अनेक नव्या योजना लाँच करत असते. एलआयसी देशातील ग्राहकांसाठी अनेक नव्या योजना लाँच करत असते. एलआयसीमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. एलआयसी विविध उत्पन्न गटांना लक्षात घेऊन अनेक उत्तम योजना लाँच करत आहे. या योजना देशात खूप लोकप्रिय आहेत. अनेक लोक या योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत. एलआयसीची आणखी एक योजना मोठा फायदा मिळवून देते, त्या योजनेचे नाव जीवन आनंद योजना आहे. एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये, तुम्ही 45 रुपयांची बचत करून एकूण 25 लाख रुपयांचा निधी गोळा करू शकता. 25 लाख रुपये जमा करण्यासाठी, तुम्हाला या योजनेत दररोज 45 रुपये वाचवावे लागतील आणि दरमहा सुमारे 1358 रुपये गुंतवावे लागतील. तुम्हाला ही गुंतवणूक एकूण 35 वर्षांसाठी करावी लागेल. 35 वर्षांनंतर, तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी एकूण 25 लाख रुपयांचा निधी गोळा करू शकता. या पैशाच्या मदतीने तुम्ही तुमचे भविष्यातील महत्त्वाचे उद्दिष्ट पूर्ण करू शकाल. एलआयसीची जीवन आनंद ही टर्म पॉलिसी आहे. ज्या कालावधीसाठी तुमच्याकडे ही पॉलिसी असेल. त्या कालावधीसाठी तुम्हाला प्रीमियम भरावा लागेल. तुम्हाला एलआयसीच्या जीवन आनंद योजनेत अनेक लाभ देखील मिळतात. LIC च्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये किमान विमा रक्कम 1 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. टॅग्स :एलआयसीव्यवसायLIC - Life Insurance Corporationbusiness