या आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला, एकूण संपत्ती पाहून विस्फारतील डोळे, टॉप १० मध्ये कोण कोण पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 05:15 PM 2023-03-17T17:15:25+5:30 2023-03-17T17:21:47+5:30
Richest Women in India: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटल्यावर तुमच्या नजरेसमोर अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला आदी येत असतील. मात्र भारतातील सर्वात श्रीमंत महिला तुम्हाला माहिती आहेत का? फोर्ब्स रिच लिस्ट २०२२ नुसार ओ. पी. जिंदाल ग्रुपच्या चेअरपर्सन सावित्री जिंदाल भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही सुमारे १४ हजार कोटी रुपये एवढी आहे. सावित्री जिंदाल एक यशस्वी उद्योगपती आहेतच सोबत त्या राजकारणातही सक्रिय आहेत.
विनोद राय गुप्ता विनोद राय गुप्ता भारतातील दुसऱ्या सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्या हॅवल्स इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर अनिल गुप्ता यांच्या आई आहेत. त्यांची एकूण संपत्ती ६.३ बिलियन डॉलर आहे.
रेखा झुनझुनवाला राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला ह्या २०२२ च्या फोर्ब्स इंडिया रिचच्या यादीनुसार भारतातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्यांची एकूण नेटवर्थ ५.९ बिलियन डॉलर आहे.
फाल्गुनी नायर नायकाच्या सीईओ फाल्गुनी नायर यांचंही नाव श्रीमंत महिलांच्या यादीत समाविष्ट आहे. त्यांची एकूण संपत्ती ४.०८ दशलक्ष डॉलर एवढी आहे.
लीना तिवारी फार्मा आणि बायोटेक कंपनी यूएसव्ही प्रा.लि.च्या मालक लीना तिवारी या भारतातील पाचव्या सर्वात श्रीमंत महिला आहेत.
दिव्या गोकुलनाथ दिव्या गोकुलनाथ यांचं नावसुद्धा भारतातील दिग्गज टेक व्यावसायिकांच्या यादीत समाविष्ट आहे. त्यांनी २०११ मध्ये BYJU ची स्थापना केली होती. त्यांची नेटवर्थ ३.६ बिलियन डॉलर आहे.
मल्लिका श्रीनिवासन मल्लिका श्रीनिवासन ट्रॅक्टर अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेडच्या सीईओ आहेत. त्यांची एकूण नेटवर्थ ही ३.४ बिलियन डॉलर आहे.
किरण मजूमदार-शॉ बायोकॉन लिमिटेड आणि बायोकॉन बायोलॉजिक्स लिमिटेडच्या फाऊंडर किरण मजूमदार-शॉ यांची एकूण नेटवर्थ ही २.७ बिलियन डॉलर एवढी आहे. भारताच्या श्रीमंत महिलांच्या यादीत त्यांचं स्थान आठवं आहे.
अनू आगा थर्मैक्स कंपनीची १९९६ मध्ये स्थापना करणार्या अनु आगा यांना फोर्ब्सच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं होतं. त्यांची नेटवर्थ २.८ बिलियन डॉलर आहे.