SBI अलर्ट! फक्त एक SMS करू शकतो अकाऊंट रिकामं; बँकेने कोट्यवधी ग्राहकांना दिला सावधानतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 09:14 AM2021-07-07T09:14:18+5:302021-07-07T09:27:19+5:30

State Bank of India : SBI ने ग्राहकांना फसवणूक करणाऱ्यांपासून वाचण्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

फसवणुकीचे नानाविध प्रकार सध्या समोर येत आहेत. अशातच देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) जर तुमचं खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

तुमची एक चूक तुमचं बँक खातं रिकामं करण्यास कारणीभूत ठरू शकते. बँकेने (SBI) ट्विटरच्या माध्यमातून ग्राहकांना महत्त्वाचा अलर्ट पाठवला आहे. SBI ने ग्राहकांना फसवणूक करणाऱ्यांपासून वाचण्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

बँक खात्यातून Unauthorized transactions वाढत असल्याने बँकेने ही महत्त्वाची माहिती ग्राहकांबरोबर शेअर केली आहे. एसबीआयच्या ग्राहकांना येणाऱ्या बनावट मेसेज संदर्भात बँकेने हे ट्वीट केलं आहे.

एका ग्राहकाच्या तक्रारीवर उत्तर देताना एसबीआयच्या अधिकृत अकाउंटवरून हे ट्वीट करण्यात आलं आहे. या बनावट मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत ग्राहकाने @TheOfficialSBI आणि @Cybercellindia ला टॅग केलं आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून याबाबत माहिती मिळवण्याकरता या ग्राहकाने ट्वीट केलं आहे. ग्राहकाला त्याचं एसबीआय खात 24 तासांत ब्लॉक होईल असा मेसेज आला होता आणि ते टाळण्यासाठी एका क्रमांकावर त्वरित कॉल करण्याचं त्या मेसेजमधून नमुद करण्यात आलं होतं.

ग्राहकाने एसबीआयकडे केलेल्या तक्रारीची बँकेने घेतली आहे. बँकेने ही बाब बँकेच्या लक्षात आणून दिल्याबद्दल संबंधित ग्राहकाचं कौतुक देखील केलं आहे. तसेच बँकेने ग्राहकाला याबाबत उत्तर दिलं आहे.

'आम्ही असा सल्ला देतो की अशाप्रकारे बँकिंग डिटेल्स अर्थात युजर आयडी/पासवर्ड/डेबिट कार्ड क्रमांक/पिन/सीव्हीव्ही/ओटीपी बाबत विचारणा करणाऱ्या कोणत्याही इमेल/SMS/कॉल्स किंवा लिंक्सना कोणताही प्रतिसाद देऊ नका' असं म्हटलं आहे.

बँकेने आणखी एक ट्वीट करत म्हटलं आहे की, 'Phishing/Smishing/Vishing संदर्भातील तपशील report.phishing@sbi.co.in वर पाठवा. तुम्ही 155260 या हेल्पलाइन क्रमांकावर देखील कॉल करू शकता किंवा तुम्ही अशी घटना घडल्यास त्याबाबत रिपोर्ट करण्यासाठी स्थानिक कायदा अंमलबजावणी संस्थेशी संपर्क साधा.'

बँकेच्या नावाने अनेकदा खोटे फोन केले जातात. तसेच पिन, ओटीपी आणि महत्त्वाचे तपशील मागितले जातात. यामुळे फसवणुकीची दाट शक्यता असते. त्यामुळे अशा फेक मेसेजपासून सावध राहण्याचा सल्ला बँकेने दिला आहे.

भारतीय स्टेट बँक (SBI) सह देशातील सर्व सरकारी बँका घरबसल्या बँकिंग सेवा (Banking Services) उपलब्ध करुन देत आहेत. बँकांनी डोर स्टेप बँकिंगसाठी (Door Step Banking) टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत.

या नंबरवर कॉल करून तुम्ही घरातून बँकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकता. ही बँकिंग सेवा सुरू झाल्यावर बँकेत जाऊन लांब रांगा लावण्याची गरज नाही. डोर स्टेप बँकिंगमध्ये बँका पैसे काढणे आणि जमा करणे यासह अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.

बँकांच्या डोर स्टेप सेवेसाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत नोंदणी करावी लागणार आहेत. तुम्ही बँकेच्या ई-सुविधा, ग्राहक कॉल सेंटर, वेब पोर्टल आणि मोबाइल अ‍ॅपद्वारे थेट बँकिंग सेवा घेऊ शकता. डोर स्टेप सेवा देण्यासाठी बँकांनी बँकिंग एजंट्सची नेमणूकही केली आहे.

डोर स्टेप बँकिंगबाबत अधिक माहिती हवी असल्यास www.psbdsb.in या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे संपूर्ण माहिती मिळेल. DSB mobile App च्या माध्यमातून ही डोर स्टेप बँकिंगची सुविधा घेता येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 1037 188 किंवा 1800 1213 721 जारी करण्यात आले आहेत. या क्रमांकावर फोन करुन त्याय योजनेचा लाभ घेता येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.