SBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट

By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 27, 2020 07:28 PM2020-09-27T19:28:38+5:302020-09-27T19:35:41+5:30

कोरोना संकट काळात स्वस्तात प्लॉट, घर अथवा दुकान खरे करण्याची तुमची इच्छा असेल तर, तुम्ही या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय 30 सप्टेंबरला एक मेगा ई-ऑक्शन करणार आहे. यात 1000हून अधिक संपत्तींचा लिलाव करण्यात येणार आहे.

जी संपत्ती कर्जाच्या बदल्यात बँकेकडे गहाण ठेवण्यात आली आहे, पण संबंधित लोकांना कर्ज फेडता आले नाही, अशा संपत्तीचा एसबीआय लिलाव करणार आहे.

आता एसबीआय आपले कर्ज अथवा थकबाकी वसून करण्यासाठी या संपत्तींचा लिलाव करणार आहे. या संपत्तीत फ्लॅट, प्लॉट आणि दुकानांचाही समावेश आहे.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, हा लिलाव अत्यंत पारदर्शक पद्धतीने होईल. बँक अशी सर्व प्रकारची माहिती उलब्ध करून देत असते, जिच्यामुळे बिडर्स लिलावाकडे आकर्षित होतील.

बँकेचे म्हणणे आहे, की ते संपत्ती फ्रीहोल्ड अथवा लीजहोल्ड आहे आणि त्याच्या ठिकानांसह इतर माहिती, ही लिलावासाठी जारी करण्यात आलेल्या सार्वजनिक नोटिशीत देते.

एसबीआयने अपल्या ट्विटर हँडलवर या लिलावासंदर्भात माहिती दिली आहे. या शिवाय लिलावासंदर्भातील कुठल्याही माहितीसाठी आपल्याला एसबीआयच्या कुठल्याही जवळच्या शाखेत संपर्क साधता येईल. यासांठी बँकेच्या शेखेत कॉन्टॅक्ट पर्सन उपलब्ध असेल.

आपल्याला ई-लिलावाच्या माध्यमाने संपत्ती विकत घ्यायची असेल, तर बँकेत जाऊन आपण संपूर्ण प्रक्रिया आणि संबंधित प्रॉपर्टीसंदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती मिळवू शकता. एवढेच नाही, तर त्या प्रॉपर्टीचे निरिक्षणही करू शकता.

मेगा ई-ऑक्शनमध्ये भाग घेण्यासाठी आवश्यक गोष्टी - - ई-लिलावाच्या नोटिशीत उल्लेख केलेल्या विशेष संपत्तीसाठी EMD (अर्नेस्ट मनी डिपॉझिट) आणि KYC डॉक्युमेंट्स संबंधित बँक शाखेत जमा करावे लागेल. - व्हॅलिड डिजिटल स्वाक्षरी : डिजिटल स्वाक्षरी मिळवण्यासाठी बोलीलावणारा ई-लिलावकरता अथवा एखाद्या अधिकृत संस्थेशी संपर्क करू शकता.

- लॉग-इन आयडी आणि पासवर्ड : संबंधित बँकेकडे EMD आणि KYC डॉक्युमेन्ट्स जमा केल्यानंतर, ई-लिलावकर्त्याकडून बोली लावणाऱ्याच्या ईमेल आयडीवर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल.

लिलावाच्या नियमानुसार, ई-लिलावाच्या दिवशी लिलावाच्या तासांत बोली लावणाऱ्यांना लॉग-इन करून बोली लावावी लागेल.

बँकेच्या वेबसाईटवर काही लिंकदेखील उपलब्ध आहेत. या लिंकवर जाऊन संपत्तीसंदर्भातील माहिती आणि लोकेशन्सची माहिती घेता येऊ शकते. या शिवाय ई-लिलावात भाग घेण्यासंदर्भातील आणि बोली लवण्यासंदर्भातल माहितीदेखील मिळवता येऊ शकते. यासाठी, सोबत दिलेल्या लिंकवरही आपण क्लिक करू शकता. https://www.bankeauctions.com/Sbi ई-प्रोक्योरमेन्ट टेक्नॉलॉजीज लि.: https://sbi.auctiontiger.net/EPROC/ प्रॉपर्टीच्या डिस्प्ले साठी : https://ibapi.in लिलाव प्लॅटफॉर्मसाठी : https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp