पेन्शनर्ससाठी SBI चं मोठं गिफ्ट, Life Certificate जमा करण्यासाठी दरवर्षी बँकेत जावं लागणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 10:57 AM2022-11-15T10:57:30+5:302022-11-15T11:05:27+5:30

सरकारी निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या हयात असल्याचा दाखला देण्यासाठी दरवर्षी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान त्यांचे ॲन्युअल लाईफ सर्टिफिकेट बँकेत सादर करावे लागते.

अलीकडेच, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. आता सरकारी पेन्शनधारकांना त्यांचा हयात असल्याचा दाखला (Annual Life Certificate) सादर करण्यासाठी दरवर्षी बँकेत जावे लागणार नाही. SBI ने 'व्हिडिओ लाइफ सर्टिफिकेट सर्व्हिस' सुरू केली आहे. यामुळे आता ग्राहकांना हे काम व्हिडिओ कॉलद्वारे करता येणार आहे.

दरवर्षी, सरकारी पेन्शनधारकांना त्यांचा हयातीचा दाखला 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान बँकेत सादर करावा लागतो. पेन्शनचा लाभ घेणारी व्यक्ती अद्यापही हयात आहे आणि त्याला पेन्शन सुरु ठेवावं यासाठी हा दाखला महत्त्वाचा आहे. पाहूया कशी असेल ही प्रक्रिया.

हे वार्षिक जीवन प्रमाणपत्र दर्शविते की निवृत्तीवेतनधारक अद्याप जिवंत आहे आणि त्याला पेन्शनची रक्कम मिळत राहिली आहे. आम्ही आमचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र कोणत्या प्रक्रियेद्वारे सबमिट करू शकू ते आम्हाला कळवा.

सर्वप्रथम पेन्शन धारकांना  ‘SBI pensions seva’ वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर सर्वात वर असलेल्या ‘VidioLc’  लिंक वर क्लिक करावं लागेल.

लिंकवर क्लिक केल्यानंतर अकाऊंट नंबर सबमिट करावा लागेल. ज्यामध्ये तुम्हाला पेन्शन येतं तोच अकाऊंट नंबर द्यावा लागेल. त्यानंतर कॅप्चा टाका आणि आपल्या आधाक डेटाचा वापर करून चेकबॉक्सवर टीक करा.

त्यानंतर तुमच्या वैध खाते क्रमांकावर आधारित तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. यानंतर आवश्यक असलेला हयातीचा दाखला जमा करा आणि नेक्स्टवर क्लिक करा. नव्या पेजवर तुमच्या सोयीनुसार व्हिडीओ कॉल अपॉईंटमेंट बुक करा. त्यानंतर तुम्हाला एसएमएस आणि ईमेलद्वारे कन्फर्मेशन येईल.

तुम्ही दिलेल्या वेळेनुसार व्हिडीओ कॉलवर जोडले जा. तुम्हाला बँक अधिकाऱ्यासमोर एक व्हेरिफिकेशन कोड वाचावा लागेल. तसंच पॅन कार्डही दाखवावं लागेल. व्हेरिफिकेशन नंतर तुम्हाचा कॅमरा होल्ड करा, जेणेकरून बँक अधिकारी तुमचा चेहरा कॅप्चर करू शकेल.

अखेर तुमची माहिती रेकॉर्ड केल्याचं तुम्हाला एका मेसेजद्वारे समजेल. त्यानंतर पेन्शन धारकांना एसएमएसद्वारे व्हिडीओ लाईफ सर्टिफिकेट सेवेच्या बाबात माहिती दिली जाईल.