SBIने पेन्शनधारकांसाठी सुरू केली नवी सुविधा, आता Whatsapp द्वारेच मिळणार पेन्शन स्लिप; पाहा प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 11:39 AM2022-11-21T11:39:45+5:302022-11-21T11:43:45+5:30

SBI WhatsApp Service: स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हॉट्सॲप सेवा सुरू केली आहे. याद्वारे ग्राहकांना अनेक सुविधा मिळणार आहेत.

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ज्येष्ठ नागरिकांसाठी (senior citizens) एक नवीन सुविधा सुरू केली आहे. याअंतर्गत आता एसबीआय ग्राहकांना त्यांची पेन्शन स्लिप इन्स्टंट मेसेजिंग अॅप प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपद्वारे (WhatsApp) मिळू शकते.

स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विट करून या सेवेबाबात माहिती दिली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअॅपद्वारे 9022690226 या क्रमांकावर ‘Hi’ लिहून मेसेज पाठवावा लागेल.

त्या सेवेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची समस्या नाही. जेव्हा तुम्ही +91 9022690226 वर Hi पाठवता, तेव्हा तुम्हाला बँकेकडून तीन पर्याय दिले जातील. या पर्यायांमध्ये बॅलन्स इन्क्वायरी, मिनी स्टेटमेंट आणि पेन्शन स्लिप यांचा समावेश असेल.

जर तुम्हाला पेन्शन स्लिप हवी असेल तर येथे तुम्हाला पेन्शन स्लिप पर्याय निवडावा लागेल. यानंतर, ज्या महिन्यासाठी स्लिप आवश्यक आहे तो महिना तुम्हाला टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला पेन्शन डिटेल प्रोसेस करण्यासंबंधी एक मेसेज मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला पेन्शन स्लिप मिळेल. तुम्ही WhatsApp बँकिंगद्वारे बॅलन्स इन्क्वायरी, मिनी स्टेटमेंट आणि डी-रजिस्टर यांसारख्या सेवांचा लाभ घेऊ शकता.

एवढेच नाही तर स्टेट बँकेच्या या सेवेद्वारे तुम्हाला बॅलन्स आणि मिनी स्टेटमेंटचीही माहितीही मिळू शकते. यासाठी ग्राहकांना प्रथम नोंदणी करावी लागेल. नोंदणीसाठी, खातेधारकांना त्यांचा खाते क्रमांक पाठवावा लागेल आणि त्यानंतर 7208933148 वर स्पेससह 'WARG' असा मेसेज पाठवावा लागेल.

लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरद्वारे एसबीआय खात्यासह एसएमएस पाठवावा लागेल. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, SBI क्रमांक 9022690226 वरून व्हॉट्सअॅप नंबरवर एक मेसेज मिळेल. तुम्ही फक्त 9022690226 वर 'Hi SBI’' पाठवू शकता किंवा व्हॉट्सअॅप मेसेजला उत्तर देऊ शकता. यानंतर, सूचनांचे पालन करून, तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

स्टेट बँक ऑफ इंडिया ही मालमत्ता, ठेवी, शाखा, ग्राहक आणि कर्मचारी यांच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी बँक आहे. बँकेने आतापर्यंत देशातील सर्वाधिक 30 लाख कुटुंबांना गृहकर्ज दिले आहे. त्यानुसार, हे देशातील सर्वात मोठे तारण कर्जदार देखील आहे. यावर्षी 31 मार्चपर्यंत बँकेचा होम लोन पोर्टफोलिओ सुमारे 5.62 लाख कोटी रुपये होता.