SBI, HDFC, ICICI Bank special fd scheme for senior citizens ends on 30 june 2021
SBI, HDFC, ICICI ग्राहकांसाठी मोठी बातमी; 30 जूनला बंद होणार 'ही' सुविधा By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 12:30 PM2021-06-05T12:30:52+5:302021-06-05T12:48:44+5:30Join usJoin usNext SBI, HDFC, ICICI Bank : 30 जून रोजी एक महत्त्वाची सुविधा बंद होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी बँक (HDFC), आयसीआयसीआय बँक (ICICI) आणि बँक ऑफ बडोदाच्या (BOB) ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. 30 जून रोजी एक महत्त्वाची सुविधा बंद होणार आहे. SBI, HDFC, ICICI या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizen) अधिक व्याजदराची एक विशेष मुदतठेव (Foxed Deposit) योजना दाखल केली होती, ती योजना 30 जून 2021 रोजी बंद होणार आहे. मे 2020 मध्ये या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास योजना आणली होती. ठराविक कालावधीसाठी असलेल्या मुदत ठेव योजनेत ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असलेल्या व्याजदरापेक्षा अर्ध्या टक्क्याहून अधिक व्याज दर देण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसाधारण ग्राहकाला मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा एक टक्का अधिक व्याज ज्येष्ठ नागरिकांना मिळते. या योजनेची अंतिम मुदत 31 मार्च होती. मात्र ती नंतर 30 जून 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. आता ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फक्त हा महिना बाकी आहे.SBI सध्या स्टेट बँक (SBI) पाच वर्षांच्या मुदतीसाठी सामान्य नागरिकांना 5.4 टक्के व्याज देते. मात्र एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने विशेष मुदतठेव योजनेअंतर्गत गुंतवणूक केली तर त्याला 6.20 टक्के दराने व्याज मिळते. ही योजना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आहे.HDFC Bank एचडीएफसी बँक (HDFC) ज्येष्ठ नागरिकांसाठी आणलेल्या विशेष मुदतठेव योजनेवर (HDFC Senior Citizen Care) सर्वसाधारण व्याजदरापेक्षा पाऊण टक्का (0.75) अधिक व्याज देते. एचडीएफसी बँकेच्या सीनियर सिटीझन केअर एफडीअंतर्गत (Senior Citizen Care FD) एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने ठेव ठेवल्यास त्याला 6.25 टक्के व्याजदर मिळेल.BOB बँक ऑफ बडोदाच्या विशेष मुदतठेव योजनेअंतर्गत 5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 6.25 टक्के व्याजदर मिळेल.ICICI Bank आयसीआयसीआय बँकेने (ICICI) ज्येष्ठ नागरिकांसाठी आयसीआयसीआय बँक गोल्डन इयर्स (Golden Years Scheme) ही विशेष योजना सुरू केली आहे. बँक या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 0.80 टक्के अधिक व्याज देत आहे. आयसीआयसीआय बँक गोल्डन ईयर्स योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 6.30 टक्के व्याज दर मिळतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. Read in Englishटॅग्स :बँकस्टेट बँक आॅफ इंडियाआयसीआयसीआय बँकएचडीएफसीbankState Bank of IndiaICICI Bankhdfc bank