MODS अंतर्गत SBI मध्ये उघडा अकाऊंट, बचत खात्यापेक्षा मिळेल अधिक व्याज; पाहा डिटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 10:50 AM 2021-02-18T10:50:03+5:30 2021-02-18T10:59:34+5:30
पाहा मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीम अंतर्गात State Bank Of India मध्ये कसं उघडाल खातं आणि काय मिळतील बेनिफिट्स बँकेत जर आपले पैसे बचतीच्या रूपात म्हणजेच सेव्हिंग अकाऊंटमध्ये जमा केले तर त्यावर लिक्विडिटी मिळते. परंतु त्यावर व्याज कमी देण्यात येतं.
सेव्हिंग अकाऊंटपेक्षा अधिक व्याज हे टर्म डिपॉझिटवर मिळतं. परंतु त्यात लिक्विडिटी नसते. याचाच अर्थ टर्म डिपॉझिट्स करण्यावर एका ठराविक कालावधीनंतच तुम्ही पैसे काढू शकता.
अशातच भारतीय स्टेट बँकेचा मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीम (MODS) हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
MODS हे एका टर्म डिपॉझिट प्रमाणे आहे, जे बचत किंवा चालू (करंट) खात्याशी जोडलेलं असतं. सामान्य टर्म डिपॉझिटमधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला ते पूर्ण बंद करावं लागतं.
परंतु MODS खात्यातून एक हजार रूपयांच्या गुणाकारात तुम्ही आवश्यक ती रक्कम काढू शकता. पैसे काढल्यानंतर त्यात जे पैसे उरतील त्यावर टर्म डिपॉझिटच्या दरानं व्याज मिळतं.
हे व्याज बँकेद्वारे ठराविक कालावधीसाठई ठरवण्यात येतं. MODS खातं उघडण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या ब्रान्चशी संपर्क साधू शकता किंवा ऑनलाईनही खातं उघडू शकता.
या खात्यात कमीतकमी एक वर्ष आणि जास्तीत जास्त पाच वर्षांच्या कालावधीसाठी रक्कम जमा केली जाऊ शकते.
MODS अंतर्गत किमान १० हजार रूपयांनी खातं सुरू करता येऊ शकतं. यानंतर १ हजार रूपयांच्या गुणाकारात यात रक्कम भरावी लागेल.
या खात्यात जास्तीतजास्त किती रक्कम भरता येईल याची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही.
खात्यातील रकमेवर टर्म डिपॉझिटप्रमाणेच व्याज मिळतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी ०.५ टक्क्यांनी अधिक व्याज देण्यात येतं.
दरम्यान, यात कोणत्याही व्यक्तीला तुम्ही नॉमिनी ठेवू शकता. तसंच यावर कर्ज घेण्याचीही सुविधा देण्यात येते.
जर ठराविक कालावधीदरम्यान तुम्ही एमओडी तोडली तर जेवढी रक्कम काढली असेल त्यावर त्या कालावधीसाठी मिळणाऱ्या व्याजावर दंडासह रक्कम भरावी लागेल. उर्वरित रकमेवर ठरल्याप्रमाणे व्याज देण्यात येईल.
एका ब्रान्चमधून दुसऱ्या ब्रान्चमध्ये हे खातं ट्रान्सफरही करता येऊ शकतं. जर तुमच्या खात्यात ३५ हजार रूपयांचा किमान बॅलन्स असेल तर तो ऑटोस्वीप (१० हजार रूपये) असेल.
MODS शी जोडलेल्या खात्यात किमान रक्कम ३ हजार रूपये ठेवावी लागेल. त्यावर ती बँक कोणत्या ठिकाणी या आहे याचं बंधन नसेल.
जर ही रक्कम कमी असेल तर सिस्टम स्वत: एमओडी तोडून किमान रक्कम जमा करेल. जर यात किमान रक्कम नसेल तर ग्राहकाला त्यावर दंड भरावा लागेल. दंडाची रक्कम ही बँक कोणत्या ठिकाणी आहे यावर अवलंबून असेल.