sbi passes on entire rbi rate cut to its customers benefits vrd
RBIनंतर SBIचं ग्राहकांना गिफ्ट, जाणून घ्या आता किती द्यावा लागणार EMI By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 05:03 PM2020-03-28T17:03:38+5:302020-03-28T17:12:19+5:30Join usJoin usNext भारतीय स्टेट बँक (एसबीआय)ने आज रिझर्व्ह बँके (आरबीआय)नं दिलेल्या सल्ल्यानुसार पॉलिसी रेटचा पूर्ण लाभ ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सकाळी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 75 बेसिस पॉईंटने कपात केली होती, त्यानंतर तो दर घसरून 4.4 टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दरात 90 बेसिस पॉईंटची कपात केली असून, दर 4 टक्क्यांच्या पातळीवर आणला आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयानंतर एसबीआयने शुक्रवारी रात्री उशीराही बाह्य आणि रेपो लिंक्ड कर्ज दरामध्ये 75-75 बेस अंकांनी कपात केली आहे. . नवीन लँडिंग दर 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती बँकेने दिली.नवीन व्याजदर काय असणार? एसबीआयने एक्सटर्नल लेंडिंग रेट ( (ईबीआर)मध्ये ०.75 टक्क्यांनी कपात केली असून, त्यानंतर ते दर 7.80 टक्क्यांवरून 7.05 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. त्याचप्रमाणे रेपो लिंक्ड लेन्डिंग रेट (आरएलएलआर) मध्ये 0.75 टक्के कपात करण्यात आली आहे. एसबीआयच्या या निर्णयानंतर आरएलएलआर 7.40 टक्क्यांवरून 6.65 टक्के पातळीवर आला आहे.ईएमआय किती वाचेल? एसबीआयने हे दोन्ही कर्जावरील व्याजदर कपात केल्यानंतर बँकेकडून 30 वर्षांच्या कालावधीसाठी गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना ईएमआयमध्ये मोठा फायदा होणार आहे. . अशा परिस्थितीत जर तुम्ही एसबीआयकडून 30 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल तर तुमचा ईएमआय 1,560 रुपयांनी कमी होईल.मुदत ठेवींचे दरही केले कमी एसबीआयने निश्चित ठेवींवर (एफडी) व्याजदरही कमी केले आहेत, जे 28 मार्चपासून लागू केले जातील. एसबीआयने विविध कालावधीतील रिटेल एफडीवरील व्याजदर 20 बेस पॉईंट्सपासून 50 बेसिस पॉईंटपर्यंत कमी केले आहेत. त्याच वेळी एसबीआयने मोठ्या प्रमाणात एफडीवरील व्याजदरांमध्ये 50 ते 100 बेस पॉईंटने कपात केली आहे. वरिष्ठ नागरिकांच्या एफडीवर इतर नागरिकांच्या एफडीच्या तुलनेत 50 बेसिस पॉईंट अधिक व्याज मिळणार आहे.टॅग्स :एसबीआयSBI