SBI-PNB-BoB सह या बँकांमध्ये आपले खाते आहे? तर आता 6 महिन्यांत मिळेल एवढा पैसा! By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 04:19 PM 2023-01-11T16:19:32+5:30 2023-01-11T16:25:36+5:30
देशातील खासगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारच्या बँका 6 महिन्यांसाठी एफडीची सुविधा देतात. आपण SBI, PNB, HDFC Bank, Bank of Baroda आणि ICICI सारख्या मोठ्या बँकांमध्ये एफडी करू शकता. जर आपलेही एखाद्या बँकेत खाते असेल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. सध्या देशातील खासगी आणि सरकारी बँकाही ग्राहकांना मुदत ठेवीची (FD) सुविधा देत आहेत. आपणही एखाद्या बँकेत FD केली असेल अथवा करायचा विचार असेल, तर आता आपण केवळ 6 महिन्यांतच मोछा नफा मिळवू शकता. एसबीआय, पीएनबीसह अनेक बँकांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
केवळ 6 महिन्यांत मिळेल जबरदस्त परतावा - सध्या फिक्सड डिपॉझिट हा पैशांची बचत करण्याचा एक सर्वात चांगला पर्याय आहे. यात आपले पैसे तर सुरक्षित राहतातच, शिवाय यात आपल्याला गॅरंटेड परतावाही मिळतो. तर आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत, केवळ 6 महिन्यांत कोणत्या बँक देत आहेत चांगला परतावा.
खासगी आणि सरकारी अशा दोन्ही बँक लिस्टमध्ये - देशातील खासगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारच्या बँका 6 महिन्यांसाठी एफडीची सुविधा देतात. आपण SBI, PNB, HDFC Bank, Bank of Baroda आणि ICICI सारख्या मोठ्या बँकांमध्ये एफडी करू शकता.
SBI Fixed Deposit Rates - आपण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6 महिन्यांसाठी एफडी केल्यास, ही बँक सर्वसामान्य नागरिकांना 4.50 टक्के दराने परतावा देत आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांना 5 टक्के दराने व्याज देत आहे.
PNB Fixed Deposit Rates - याच पद्धतीने पीएनबी सर्वसामान्य नागरिकांना 6 महिन्यांच्या एफडीवर 4.50 टक्के दराने, तर ज्येष्ठ नागरिकांना 5.00 टक्के दराने व्याज देत आहे.
BoB Fixed Deposit Rates - बँक ऑफ बडोदादेखील 6 महिन्यांसाठी आपल्या ग्राहकांना एफडीवर 4.50 टक्के दराने व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 5.00 टक्के दराने व्याज देत आहे.
HDFC Bank and ICICI Bank Fixed Deposit Rates - प्रायव्हेट सेक्टर एचडीएफसी बँकेसंदर्भात बोलायचे झाल्यास, ही बँक सर्वसामान्य नागरिकांना 6 महिन्यांसाठी 4.50 टक्के दराने व्याज देत आहे. तर याशिवाय आयसीआयसीआय बँक आपल्या ग्राहकांना 4.75 टक्के दराने व्याज देत आहे.