SBI-PNB-ICICI-HDFC सह अनेक बँकांकडून आनंदाची बातमी, कोट्यवधी ग्राहकांना होणार फायदा! By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 08:37 PM 2023-03-01T20:37:16+5:30 2023-03-01T20:59:50+5:30
RD Interest Rates : बँकांमध्ये गुंतवणूक केल्याने लोकांना बरेच फायदे मिळतात आणि चांगले व्याज देखील मिळते. नवी दिल्ली : तुम्ही आरडी (Bank RD) सुद्धा उघडली आहे का...? किंवा तुमचाही येत्या काही दिवसांत आरडी करण्याचा प्लॅन आहे, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. बँकांमध्ये गुंतवणूक केल्याने लोकांना बरेच फायदे मिळतात आणि चांगले व्याज देखील मिळते.
आरडी म्हणजेच रिकरिंग डिपॉझिटवर (recurring deposit) तुम्हाला चांगले व्याज मिळते. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला एसबीआय (SBI RD), पीएनबी (PNB RD) सह कोणत्या बँका आरडीवर किती व्याज देत आहेत? ते सांगणार आहोत.
अनेक बँकांनी वाढवले व्याजदर तुम्ही ऑफलाइन, ऑनलाइन किंवा मोबाइल बँकिंगद्वारे आरडी उघडू शकता. एसबीआय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेने आरडीवरील व्याजात वाढ केली आहे. आता या बँका पूर्वीपेक्षा जास्त व्याज देत आहेत.
आरडी स्कीम म्हणजे काय? आरडी ही एक लहान बचत योजना आहे. यामध्ये तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकांमधूनही खाते उघडू शकता आणि त्यात तुम्ही फक्त 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. यामध्ये पैसे गुंतवल्यावर तुम्हाला बँकांकडून अधिक चांगले व्याज दिले जाते आणि बँकेकडून आरडी करून घेतल्यावर तुम्हाला अनेक सुविधा दिल्या जातात. दरम्यान, सर्व बँका आरडीवर वेगवेगळे व्याज देतात.
SBI आरडीवरील व्याजदर स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला 12 महिन्यांपासून 120 महिन्यांपर्यंत 6.80 ते 7 टक्के व्याज देत आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला 100 रुपये गुंतवावे लागतील.
PNB आरडीवरील व्याजदर पंजाब नॅशनल बँक (PNB) 6 महिने ते 10 महिन्यांच्या आरडीवर 5.5 ते 7.25 टक्के व्याज देते. तुम्ही हप्त्याच्या शेवटच्या दिवशीही आरडी भरू शकता.
HDFC बँकेतील आरडीवरील व्याजदर एचडीएफसी बँक तुम्हाला 6 महिन्यांपासून ते 120 महिन्यांपर्यंतच्या आरडीवर 4.5 ते 7.10 टक्के व्याज देते, ज्यामध्ये तुम्हाला दररोज गुंतवणूक करावी लागते.
ICICI आरडीवरील व्याजदर आयसीआयसीआय बँक तुम्हाला आरडीवर 6 महिने ते 120 महिन्यांपर्यंत 4.75 ते 7.10 टक्के व्याज देते. ज्यामध्ये तुम्ही किमान 500 रुपये गुंतवू शकता.
Yes Bank आरडीवरील व्याजदर येस बँक तुम्हाला आरडीवर 6 महिने ते 10 वर्षांपर्यंत 6 ते 7.50 टक्के व्याज देते.