FD Scheme: SBI ग्राहकांना देणार जबरदस्त परतावा! अमृत कलश योजनेत गुंतवणूक करून मजबूत व्याज मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 11:21 AM2023-05-05T11:21:18+5:302023-05-05T11:34:01+5:30

SBI Special FD Scheme: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी खास एफडी योजना आणली आहे.

SBI Special FD Scheme: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी खास एफडी योजना आणली आहे. SBI अमृत कलश योजना असे या योजनेचे नाव आहे.

SBI नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नव नव्या योजना लाँच करत असते. आता ग्राहकांसाठी बँकेने अमृत कलश योजना लाँच केली आहे.

SBI Amrit Kalash Scheme: स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष FD योजना सुरू केली आहे.

SBI अमृत कलश ही स्कीम सर्वसामान्या ग्राहकांच्या फायद्याची योजना आहे.

या योजनेची अंतिम मुदत ३१ मार्च रोजी संपणार होती, ती आता ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. बँकेने अधिसूचना जारी करून याबाबत माहिती दिली आहे.

या योजनेंतर्गत, सामान्य श्रेणीतील म्हणजेच ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या ग्राहकांना ७.१० टक्के व्याजदर दिला जात आहे.

यावेळी, बँक ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याजदर देत आहे. या योजनेचा कालावधी ४०० दिवसांचा आहे.

या योजनेअंतर्गत तुम्ही २ कोटी किंवा त्याहून कमी रक्कम गुंतवू शकता.

SBI च्या या योजनेअंतर्गत, ग्राहकांना मासिक, त्रैमासिक, सहामाही आधारावर व्याजाचा लाभ मिळतो. यासोबतच टीडीएस कापल्यानंतर ग्राहकांच्या मॅच्युरिटीच्या व्याजाची रक्कम खात्यात जोडली जाते. या योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधू शकता.