SBI : जबरदस्त परतावा! SBI'च्या 'या' फंडाने ५ वर्षात २० हजाराचे केले ३३ लाख रुपये By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 11:13 AM 2024-06-22T11:13:25+5:30 2024-06-22T11:19:48+5:30
SBI : एसबीआयच्या पीएसयू, इन्फ्रास्ट्रक्चर, कॉन्ट्रा आणि मिड-कॅप फंडांनी गेल्या पाच वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. SBI PSU सारख्या फंडांनी पाच वर्षांत गुंतवणूकदारांना तीनपट परतावा दिला आहे. SBI : आपण सर्वजण चांगल्या परताव्यासाठी गुंतवणुकीचा पर्याय शोधत असतो. अनेक बँकांनी चांगल्या परताव्यासाठी नव्या योजना लाँच केल्या आहेत. एसबीआय बँकही आपल्या ग्राहकांना चांगला परतावा देत आहे. SBI म्युच्युअल फंडानेही मोठा परतावा दिला आहे.
SBI म्युच्युअल फंडच्या PSU, पायाभूत सुविधा, कॉन्ट्रा आणि मिड-कॅप फंडांनी गेल्या पाच वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. SBI PSU सारख्या फंडांनी पाच वर्षांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जवळपास तीनपट वाढ केली आहे.
एसबीआय थीमॅटिक इक्विटी फंड हा गेल्या पाच वर्षांत ४२.४८% च्या SIP रिटर्नसह चांगली कामगिरी करणारा SBI म्युच्युअल फंड आहे. त्याची मालमत्ता (AUM) ३,०७१ कोटी रुपये आहे, तर त्याचे निव्वळ मालमत्ता मूल्य (NAV) रुपये ३६.२१ कोटी आहे. २०,००० रुपयांची एसआयपी किंवा १२ लाख रुपयांची एकूण गुंतवणूक पाच वर्षांत ३३.५० लाख रुपये झाली आहे.
एसबीआय, पॉवर ग्रिड, एनटीपीसी आणि कोल इंडिया हे त्याच्या पोर्टफोलिओमधील मुख्य स्टॉक आहेत. या क्षेत्रीय पायाभूत सुविधा निधीने पाच वर्षांच्या कालावधीत ३७.७० टक्के SIP परतावा दिला आहे.
त्याची AUM रुपये ३,०८८ कोटी आहे, तर त्याची NAV रुपये ५५.७२ आहे. फंडातील २०,००० रुपयांच्या एसआयपीने पाच वर्षांच्या कालावधीत ३०.०२ लाख रुपये दिले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, भारती एअरटेल, एल अँड टी आणि कार्बोरंडम युनिव्हर्सल लिमिटेड हे त्याच्या पोर्टफोलिओमधील मुख्य स्टॉक्स आहेत.
एसबीआयच्या कॉन्ट्रा फंडाने पाच वर्षांत ३६.५४ टक्के वार्षिक एसआयपी परतावा दिला आहे. त्याची AUM रुपये ३०,५२० कोटी आहे, तर त्याची NAV रुपये ४०१.०८ आहे. फंडातील २०,००० रुपयांची एसआयपी पाच वर्षांत २९.१३ लाख रुपये झाली आहे. निफ्टी बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय आणि गेल हे त्याच्या पोर्टफोलिओमधील मुख्य स्टॉक्स आहेत.
याने पाच वर्षांत ३३.२५ टक्के वार्षिक एसआयपी परतावा दिला आहे. त्याची AUM १८,३९९ कोटी आहे, तर तिचा NAV २५९.८ आहे. फंडातील २०,००० रुपयांच्या एसआयपीने पाच वर्षांच्या कालावधीत २७.०७ लाख दिले आहेत. टोरेंट पॉवर, शेफलर इंडिया, थर्मॅक्स लिमिटेड आणि सुंदरम फायनान्स लिमिटेड हे त्याच्या पोर्टफोलिओमधील मुख्य स्टॉक्स आहेत.