Second Tranche Of Gold Bonds Scheme Opens On May 24 Check Issue Price modi government rbi
सरकार देणार स्वस्तात सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी; पाहा काय आहे स्कीम By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 12:45 PM2021-05-23T12:45:10+5:302021-05-23T12:49:32+5:30Join usJoin usNext Gold Scheme 2021-22: २४ ते २८ मे दरम्यान करता येणार गुंतवणूक केंद्र सरकारनं सोवरेन गोल्ड बॉन्डच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ४,८४२ रूपये प्रति ग्रॅम हे मूल्य निश्चित केलं आहे. नागरिकांना यामध्ये २४ ते २८ मेदरम्यान गुंतवणूकीची संधी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यासाठी सरकारनं सबस्क्रिप्शनसाठी ४,७७७ रूपयं प्रति ग्रॅम इतकं मूल्य निश्चित करण्यात आलं होतं. गोल्ड बॉन्ड ऑनलाइन खरेदी केल्यास प्रति ग्रॅम ५० रूपयांची सूट देण्यात येणार आहे. केंद्र सरकार मे २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये सहा टप्प्यांमध्ये गोल्ड बाँड्स जारी करणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील गुंतवणूकीसाठी १७ मे ते २१ मेदरम्यान संधी देण्यात आली होती. आता सरकारनं दुसऱ्या टप्प्यासाठीही किंमत निश्चित केली आहे. गुंतवणूकदारांसाठी ही गुंतवणूकीची योग्य संधी आहे. भारतात गुंतवणूकीसाठी सोवरेन गोल्ड बॉन्ड चांगला पर्याय मानला जातो. हे केंद्र सरकारच्यावतीनं रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात येतात. सोवरेन गोल्ड बॉन्डच्या अर्जासह गुंतवणूकदाराकडे पॅनकार्ड असणं आवश्यक आहे. सोवरेन गोल्ड बॉन्ड गुंतवणूकदारांना ऑनलाइनदेखील खरेदी करता येणार आहे. याशिवाय गुंतवणूकदारांना बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, काही पोस्ट ऑफिसेस यातून सोवरेन गोल्ड बॉन्ड खरेदी करता येतात. याशिवाय गुंतवणूकदारांना एनएसई, मुंबई शेअर बाजारातूनही सोवरेन गोल्ड बॉन्ड खरेदी करता येतील. सोवरेन गोल्ड बॉन्ड स्कीममध्ये गुंतवणूकदारांना एका आर्थिक वर्षात कमाल ४ किलोग्राम सोन्याच्या बॉन्डमध्ये गुंतवणूक करता येते. तर कमाल गुंतवणूक एक ग्राम सोन्याची असते. HUFs एका आर्थिक वर्षात ४ किलोग्रामपर्यंत सोन्यात गुंतवणूक करू शकणार आहेतच. तर ट्रस्टना २० किलोग्राम पर्यंत गुंतवणूक करू शकतात. सोवरेन गोल्ड बॉन्ड मॅच्युरिटीवर टॅक्स फ्री असतं. यामध्ये एक्सपेन्स रेशो काहीही नाही. भारत सरकारद्वारे हे देण्यात येत असल्यानं यात डिफॉल्टचा धोका नसतो. हा HNIs साठी उत्तम पर्याय आहे. यामध्ये मॅच्युरिटीपर्यंत होल्ड केल्यानं कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागत नाही. इक्विटीवर १० टक्के कॅपिटल गेन टॅक्स लागतो. अशा परिस्थितीत दीर्घ काळाच्या गुंतवणूकीसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. फिजिकल गोल्ड ऐवजी गोल्ड बॉन्ड मॅनेज करणं सोपं आणि सुरक्षित असतं. यामध्ये प्लोरिटी तपासण्यासारख्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. तसंच किंमत सर्वात शुद्ध सोन्याच्या आधारावर निश्चित केली जाते. यामध्ये बाहेर पडण्याचे पर्यायही सोपे असतात. गोल्ड बॉन्डवर कर्ज घेण्याचा पर्यायही उपलब्ध असतो. टॅग्स :सोनंगुंतवणूकआरक्षणसरकारपैसाकरGoldInvestmentreservationGovernmentMONEYTax