नादच खुळा! आर्यन खानची एका दिवसाची कमाई पाहून वडील शाहरूख खाननेही कौतुक केले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 12:12 PM2023-05-02T12:12:29+5:302023-05-02T12:17:21+5:30

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने ३० एप्रिल रोजी त्याचा कपड्यांचा ब्रँड Dyavol.x लाँन्च केला आहे. या ब्रँडच्या कपड्यांची किंमत लाखो रुपये आहे, परंतु लॉन्च झाल्यानंतर एका दिवसात संपूर्ण स्टॉक विकला गेला.

आर्यन खानने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून आनंद व्यक्त केला आहे. अभिनेता शाहरुख खानने स्वतः मुलगा आर्यन खानच्या ब्रँडची जाहिरात केली आहे. याशिवाय शाहरुखचा मॅजिक फॅक्टरही आर्यनच्या कामी आला.

आर्यन खानचे कलेक्शन ऑनलाइन येताच लोकांनी ते खरेदी करण्यासाठी गर्दी केली. आर्यन खानचा संपूर्ण स्टॉक एका दिवसात संपला. आर्यनने याबाबत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लोकांचे आभार मानले आहेत. तसेच पुढील स्टॉकसाठी तयार राहा असे लिहिले आहे.

शाहरुख खाननेही आर्यनची ही पोस्ट त्याच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केली आहे. आर्यन खानच्या या ब्रँडशी किंग खानचा मॅजिक फॅक्टरही जोडला गेला आहे. आर्यन खानच्या ब्रँड प्रमोशनसाठी शाहरुखने घातलेले लेदर जॅकेट काही तासांतच विकले गेले.

या जॅकेटवर बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची सही आहे. काळ्या लेदर जॅकेटचे फक्त ३० पीस होते आणि त्याची किंमत २ लाख ५५५ रुपये होती. म्हणजेच आर्यनने या जॅकेटमधून अवघ्या काही तासांत ६,०१६,६५० रुपये कमावले.

आर्यनच्या ब्रँडच्या कपड्यांची किंमत लाखोंमध्ये आहे. या प्रिमियम ब्रँडचे कपडे तुम्ही ऑनलाइन देखील खरेदी करू शकता. या ब्रँडचे सर्वात कमी किमतीचे कपडे २० हजारांपासून सुरू होतात. केवळ एका टी-शर्टची किंमत २४ हजार आणि जॅकेटची किंमत २ लाखांहून अधिक आहे. अशा परिस्थितीत हा ब्रँड सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

आर्यन खान D, Yavol चा को पार्टनर आहे. लेटी ब्लागोएवा आणि बंटी सिंग यांच्या भागीदारीत तो हा व्यवसाय सुरू करत आहे. गेल्या वर्षी आर्यनने या दोन भागीदारांसोबत स्पिरिट्स मार्केटमध्ये प्रवेश केला जेव्हा त्यांनी त्यांचा प्रीमियम व्होडका ब्रँड लॉन्च केला होता.

व्यवसायाव्यतिरिक्त आर्यन लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ज्याची निर्मिती होम प्रॉडक्शन हाऊसच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट बॅनरखाली होणार आहे. याशिवाय शाहरुखच्या जागी आर्यन आयपीएल लिलावाचे काम आणि त्याच्याशी संबंधित महत्त्वाच्या बाबी पाहतो. यात सुहानाही त्याला मदत करते.

आर्यन खानच्या कपड्यांच्या ब्रँडचे नाव D'YAVOL X आहे, ज्याची वेबसाइट नुकतीच लॉन्च झाली. परंतु पहिल्याच दिवशी वेबसाईट क्रॅश झाल्याने काही काळ ग्राहकांना थांबावं लागले. वेबसाइट पुन्हा लाइव्ह होताच ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली.

जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना कपड्यांवर खूप पैसे खर्च करणे आवडत नाही किंवा परवडत नाही तर तुम्हाला कदाचित हे कलेक्शन आवडणार नाही. कारण आर्यनच्या ब्रँडमधील कपडे फक्त २० हजारांच्या वर आहेत. अनेक नेटिझन्सचे आर्यनच्या कपड्यांच्या किंमतीवरून त्याला सोशल मीडियात ट्रोल केले.