एक बातमी अन् शेअरच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली; ₹180 वर पोहोचला भाव, काय म्हणते कंपनी?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 03:17 PM2024-04-08T15:17:16+5:302024-04-08T15:25:38+5:30

गेल्या सहा महिन्यांत हा शेअर 25% ने, तर गेल्या एका वर्षात 40% ने वधारला आहे.

शेअर बाजारात आज नायकाच्या शेअरमध्ये 8% पर्यंतची तेजी दिसून आली आहे. कंपनीचा शेअर आज 180.85 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. शेअरच्या या तेजी मागे एक मोठे कारण आहे.

खरे तर, नायकाला Q4 मध्ये मोठा नफा होईल, अशी आशा आहे. यामुळे, आज नायकाची मूळ कंपनी एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्सच्या शेअर्सची जबरदस्त करेदी होत आहे.

काय म्हणते कंपनी? - आपल्याला जानेवारी-मार्च तिमाही दरम्यान रेव्हेन्यूमध्ये "हाय ट्वेन्टी" वार्षिक ग्रोथची आशा आहे, असे कंपनीने नव्या बिझनेस रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ब्यूटी आणि पर्सनल केअर सेगमेंटसाठी, नायकाची ग्रॉस मर्चेंडाइज व्हॅल्यू (GMV) वार्षिक आधारावर 30% ने वाढण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर, कंपनीला सेल्स व्हॅल्यूमध्येही 25% पर्यंत ग्रोथ होण्याची अपेक्षा आहे.

महत्वाचे म्हणजे, डिसेंबर तिमाहीत नायकाचा नेट प्रॉफिट वार्षिक आधारावर दुप्पट झाला आहे. तसेच, गेल्या वर्षाच्या तुलनेत रेव्हेन्यूमध्येही 22% ची वृद्धी झाली आहे. व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफी (EBITDA) पूर्वी हिच्या कमाईचे मार्जिनही गेल्या डिसेंबर महिन्यात 5.3% ने वाढून 5.5% झाले होते.

2021 आला होता IPO - नायकाचा आयपीओ 2021 मध्ये आला होता. तेव्हा त्याचा प्रराइस बँड 1125 रुपये निश्चित करण्यात आला होता. दरम्यान, कंपनीने 1 शेअरवर 5 बोनस शेअर्स देखील दिले आहेत.

गेल्या सहा महिन्यांत हा शेअर 25% ने, तर गेल्या एका वर्षात 40% ने वधारला आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, हा शेअर आणखी वधारून 195 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)